Chainsukh Sancheti Sarkarnama
विदर्भ

Chainsukh Sancheti News : भाजप नेते चैनसुख संचेतींच्या वाहनावर जमावाची दगडफेक; नेमके काय झाले ?

Malkapur Cooperative Bank : बँकेत सुमारे ४०० अडकलेच ठेवीदार संतापले

Sunil Balasaheb Dhumal

Buldana Political News : राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका माजी आमदाराच्या वाहनावर दगडफेक झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने मलकापूर अर्बन को-ऑप. बँकेचा परवाना रद्द केला आहे. यानंतर संतापलेल्या ठेवीदारांनी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या वाहनाला लक्ष्य केले. संतापलेल्या जमावाने पाठलाग करून संचेती यांच्या वाहनावर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. हा प्रकारामुळे बुलडाणा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Latest Political News)

मलकापूर बँकेच्या ठेवीदारांची बैठक सिडको एन-३ येथील केशरबाग मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार चैनसुख संचेती हेदेखील पोहोचले. बँकेत सुमारे ४०० ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. त्यामुळे येथे जमलेले लोक संतापले होते. जमावाने बँकेच्या व्यवस्थापकाला मारहाण केली.

"बँकेला ४७ कोटी ९१ लाखांचा ढोबळ नफा झाला आहे. आम्ही आरबीआयच्या विरोधात सक्षम प्राधिकरणाकडे अपिल दाखल केले आहे. २६ सप्टेंबरला त्याची दिल्लीत सुनावणी आहे. निकाल आमच्या बाजूने लागेल व बँकेला पुन्हा परवानगी मिळेल", असे संचेती सांगत होते. मात्र, लोक त्यांचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. (Maharashtra Political News)

'राजकीय भाषा बोलण्यापेक्षा पैसे कधी देणार ते स्टॅम्प पेपरवर लिहुन द्या', अशी मागणी ठेवीदारांनी केली. त्यापैकी काही जण बैठकीच्या मंचावर चढले व त्यांनी माजी आमदार संचेती यांना घेरण्याचा प्रयत्न केला. या वेळी तैनात पोलिसांनी संचेती यांना बैठकीतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. संचेती बाहेर पडताच जमावातील युवकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. पोलिस सुरक्षेत संचेती यांना त्यांच्या वाहनापर्यंत आणण्यात आले. मात्र, जमावाने त्यांच्या वाहनावर दगडफेक केली. या दगडफेकीत संचेती यांच्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

माजी आमदार संचेती यांच्यासोबत छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या या प्रकाराची माहिती बुलडाणा जिल्ह्यात पोहोचताच संचेती विरोधकांनी मलकापूरसह जिल्ह्यात त्यांच्या विरोधात प्रचाराला सुरुवात केली. ठेवीदारांच्या सभेतील गोंधळाचे व संचेती यांच्या वाहनावरील दगडफेकीचे व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना संचेती म्हणाले, 'आजघडीला बँकेकडे ६६९ कोटी ५९ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. १२० पतसंस्थांच्या ठेवींची संख्या २१७ कोटी आहे. उर्वरित ४५२ कोटी ५९ लाखांच्या ठेवी सामान्य ठेवीदारांच्या आहेत. ठेवीदारांची रक्कम सहज देता येऊ शकते. आरबीआयची परवानगी मिळाली की, बँक मार्च २०२४ पर्यंत सर्व ठेवीदारांची रक्कम व्याजासह देईल."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT