Pusad Bazar Samiti Election:
Pusad Bazar Samiti Election:  Sarkarnama
विदर्भ

Pusad Bazar Samiti : पुसद बाजार समितीवर मनोहर नाईक, इंद्रनील नाईकांचे वर्चस्व कायम; निलय नाईकांना धक्का!

सरकारनामा ब्यूरो

Yavatmal District APMC Election : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.28 एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर काही बाजार समित्यांच्या निवडणुकींचे निकालही समोर आले आहेत. यवतमाळमधील पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकालही समोर आला आहे.

पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री मनोहरराव नाईक आणि आमदार इंद्रनिल नाईक यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मनोहरराव नाईक पॅनलचे 18 जागांपैकी 18 उमेदवार निवडून आले आहेत.

या निवडणुकीत आमदार इंद्रनिल नाईक यांच्या नेतृत्वामध्ये मोठं यश आलं हे. माजी मंत्री मनोहर नाईक यांनी आणि आमदार इंद्रनिल नाईक यांनी पुसद तालुक्यातील सर्व सोसायटी व ग्रामपंचायत, व्यापारी हमाल गटाला योग्य मार्गदर्शन करत सर्व जागांवर उमेदवार भरघोस मतांनी निवडून आणण्यात त्यांना यश आलं आहे.

दरम्यान, पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीवर 'मविआ'ने झेंडा फडकवला आहे. यात 'मविआ'चे 18 जागांपैकी 18 उमेदवार निवडून आले आहेत. तर भाजप-शिवसेनेला एकाही जागेवर यश मिळवता आलं नाही. त्यामुळे भाजपचे आमदार निलय नाईकांना मोठा धक्का बसला आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT