Manoj Jarange Patil Sarkarnama
विदर्भ

Manoj Jarange : ''मला जर शांतता ठेवायची नसती आणि मी जर त्या पोरांना...'' ; मनोज जरांगेंचं विधान!

Maratha Reservation : सिल्लोड तालुक्यातील फुलंब्रीतील 'ती' घटना सांगत, २४ डिसेंबरपर्यंत शांत राहण्याचं मराठा समाजाला केलं आवाहन.

Mayur Ratnaparkhe

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे हे राज्यभर सभा घेत आहेत. यातून त्यांनी मराठा समाजाला २४ डिसेंबरपर्यंत शांत राहण्याचं आवाहन केलं. शिवाय, यावेळी त्यांनी छगन भुजबळांवर जोरदार टीकाही केली.

याचबरोबर मनोज जरांगे यांनी सिल्लोड तालुक्यातील फुलंब्री येथील एक घटना सांगत, मराठा समाज कशाप्रकारे संस्कारी आहे आणि कशी एकजुट आहे हे देखील यावेळी सांगितलं.

वाशिमच्या सभेत बोलताना मनोज जरांगे(Manoj Jarange) म्हणाले, ''७० वर्षांपासून आपली लेकरं आरक्षणाची वाट पाहत आहेत. आता विजयाचा सुवर्णक्षण जवळ आला आहे. परंतु त्यांची(भुजबळांची) एकच इच्छा आहे, जातीय तेढ निर्माण करायची आणि आपलं ध्येय विचलीत करायचं, असा त्यांचा डाव आहे. मात्र सध्या आपण अपमान पचवत आहोत, नाहीतर त्यांना जागेवरच नीट केलं असतं. परंतु आता सध्या आपला नाईलाज आहे.''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच, ''आपली लेकरं आरक्षणाची वाट बघताय, २४ डिसेंबरला महाराष्ट्रातील सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. एकही मराठा आरक्षणाविना राहणार नाही. म्हणून आपल्याला आपलं आंदोलन शांततेतच पुढे न्यायचं आहे. माझ्या एका निर्णयामुळे माझ्या गोरगरीब मराठ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून मी शांत आहे.'' असं जरांगे म्हणाले.

याशिवाय जरांगे म्हणाले, ''त्यांनी(छगन भुजबळ) अंबडला आल्यानंतर खूप काही काढलं, तरीही मी शांत बसलो. त्यांनी हिंगोलीतही खूप काही काढलं, जातीय तेढ निर्माण होईल असे शब्दही वापरले, तरीही माझा समाज आणि मी देखील शांत बसलो. तुम्हाला कालचं उदाहरण सांगतो, सिल्लोड तालुक्यातील फुलंब्रीत मराठ्यांचा बोर्ड फाडून जाळला गेला. तिथे मराठा समाजाचे ५० ते ६० हजार पोरं जमले होते.''

यानंतर ''मला तिथल्या पोलीस उपनिरीक्षकांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की इथे काहीही घडू शकतं, तुम्हाला विनंती आहे तुम्ही जर एक फोन केला, तर सगळे मराठे शांत होतील. मला जर शांतता ठेवायची नसती आणि मी जर त्या पोरांना म्हणालो असतो की, होऊ द्या... तर पोरांनी घरादारासकट मोडून टाकलं असतं.'' असं जरांगे म्हणाले.

पुढे जरांगे म्हणाले ''परंतु त्या पोलीस उपनिरीक्षकांनी सांगितलं की, पाटील इथे काय घडेल सांगूच शकत नाही. त्यावर मी म्हणालो त्यांना फोन द्या, त्यांनी फोन स्पीकरवर लावला आणि मी एवढंच सांगितलं तुमचा कितीही अपमान झाला असला, बोर्ड जाळला असला तरी जाळू द्या. त्यांचेही आगामी काळात बोर्ड राहणार आहेत. ते सुद्धा गाव सोडून जाणार नाहीत, असं करणारा गल्ली सोडून जाणार नाही. आरक्षणाचा दिवस जवळ आला आहे, फक्त २४ डिसेंबरपर्यंत शांत रहा, अपमान पचवा आणि मी सांगतोय म्हणून माघारी जा. त्यानंतर जवळपास ५० ते ६० हजार पोरं दोन तासांच्या आत आपल्या गावी गेले. हे संस्कार आमच्या मराठ्यांवर आहेत.'' असं मनोज जरांगे यांनी यावेळी बोलून दाखवलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT