Rahul Gandhi
Rahul Gandhi  Sarkarnama
विदर्भ

अखेर राहुल गांधींच्या सभेत मनसैनिक पोहचले अन् काळे झेंडे दाखवले

सरकारनामा ब्यूरो

MNS News : काँग्रेस नेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या टिकेमुळे मनसेने त्यांच्या सभेत काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला. मात्र पोलिसांनी सभा स्थळावर जाण्यापासून मनसे नेत्यांना रोखलं. पण अखेर मनसे कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या सभेत पोहचत काळे झेंडे दाखवले. मात्र पोलिसांनी लगेच त्यांना ताब्यात घेतल्याने राहुल गांधींची सभा विनाअडथळा पार पडली.

राहुल गांधींनी (Rahul Gandhi) दोन दिवसांपूर्वी सावरकरांवर केलेल्या टिकेमुळे भाजप (BJP), मनसे (MNS) व शिंदे गट राहुल गांधींच्याविरोधात आक्रमक झाले. त्यानंतर राज्यात जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. भाजपच्यावतीनेही राज्यभर आंदोलनं करण्यात आली. तर मनसेचे नागपूर जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर यांच्या नेतृत्वात मनसेच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या सभेत काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर पोलिसांकडून लगेच त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे राहुल गांधींची सभा उधळून लावण्याचा मनसेचा प्लॅन फसला.

मनसेचे कार्यकर्त्ये राहुल गांधीची सभा उधळून लावण्यासाठी राज्यभरातून शेगावच्या परिसरात आले होते. पण सभा स्थळावर पोहचण्याआधीच तब्बल शंभर पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यामध्ये मनसे (MNS) नेते संदिप देशपांडे, अविनाश जाधव देखील होते. या सभेला प्रचंड पोलीस बंदोबस्त असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांचा सभेत काळे झेंडे दाखवत सभा उधळून लावण्याच्या प्रयत्नाला यश आले नाही.

दरम्यान,राहुल गांधींनी आजच्या सभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत एक शब्दही काढला नाही. त्यामुळे भाजप (BJP), मनसे व शिंदे गट यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे ते काहीसे नरमलेले दिसले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT