Nagpur Political News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन उभं झालंय. मराठा आरक्षण हा एकच मुद्दा सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चिला जातोय. आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना नागपूर जिल्ह्यातूनही प्रतिसाद मिळतोय. नागपुरात जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय.
मराठा आरक्षण मिळालच पाहिजे, या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अनेकांनी बुधवारी (ता. एक) मुंडन करीत राज्य सरकारचा निषेध नोंदविला. शहरातील महाल परिसरात हे साळखी उपोषण सुरू आहे. आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात व मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करीत मुंडन करून घेतले. संपूर्ण विदर्भातील मराठा समाज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आलं. (Maratha activists' Mundan movement at Nagpur in support of Maratha Reservation and Manoj Jarange Patil)
मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या दहा दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाच्या नागरिकांना कुणबी-मराठा जातप्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ द्या, अशी त्यांची मागणी आहे. विशेष म्हणजे निजामकाळात मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी असं जात प्रमाणपत्र देण्यात येत होतं, पण निजाम संस्थान महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतर मराठ्यांचं आरक्षण गेलं. तेव्हापासून आरक्षणाची आमची लढाई सुरू असल्याचं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळावं, अशी त्यांच्यासह संपूर्ण समाजाची मागणी आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने जीआरदेखील काढला आहे. या जीआरमध्ये सरकारने ज्यांच्याकडे जुन्या नोंदी आहेत, त्यामध्ये कुणबी वंशावळ असा उल्लेख असेल त्यांना मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा प्रमाणपत्र दिलं जाईल, असं सरकारने म्हटलं आहे. त्यावर आक्षेपही घेण्यात आला. यादरम्यान मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली मुदत संपल्यानं त्यांनी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलंय. जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू करताच राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनांना सुरुवात झालीय.
विदर्भातही मराठा आंदोलन पेट घेत आहे. बुलडाणा व अकोला जिल्ह्यात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आलीय. मंत्र्यांना जिल्हाबंदी करण्यात आलीय. अकोल्यात गजानन हरणे नामक व्यक्तीनंही बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. नागपुरातील गेल्या काही दिवसांपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय. या साखळी उपोषणात सहभागी झालेल्या मराठा कार्यकर्त्यांनी बुधवारी मुंडन करीत सरकारचा धिक्कार केला. त्यामुळे विदर्भातील मराठा आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवसत वाढतच आहे.
(Edited by : Atul Mehere)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.