OBC meeting in Akola Sarkarnama
विदर्भ

OBC From Akola on Maratha : मराठ्यांनो फसू नका...स्वतंत्र आरक्षण मागा, आम्ही साथ देऊ

जयेश विनायकराव गावंडे

Reservation issue from Akola : सरकारकडून पुन्हा मराठा समाजाला फसविण्याचा प्रयत्न होत आहे. मराठा समाजानं ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न घेता स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण मागावं. ओबीसी आणि मराठा समाजाला लढवत ठेवण्यासाठी तोच जुना फंडा पुन्हा वापरला जातोय. त्यामुळं मराठ्यांनो फसू नका...स्वतंत्र आरक्षण मागा, आम्ही साथ देऊ, असं आवाहन महाराष्ट्र ओबीसी महासंघाच्यावतीने अकोल्यात करण्यात आलं.

महाराष्ट्र ओबीसी महासंघाचेअध्यक्ष बालमूकुंद भीरड यांनी बुधवारी (ता. १) अकोला येथुन मराठा समाजाला जाहीर आवाहन केलं. ओबीसी आतापर्यंत मराठा समाजाचं ऐकत आला आणि तसेच करत गेला आहे. सत्तेवरती मराठा समाजच बसलेला आहे. परंतु हेच मराठा नेते मराठ्यांवरती अन्याय करताहेत. आमची सर्व मराठा समाजाला विनंती आहे की, ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न मागता स्वतंत्र आरक्षणाची मागणी करा, असं ते म्हणाले. (Maratha community should ask for separate reservation, we will support OBC community's stand announced from Akola)

मराठा समाजासह कोणत्याही समाजानं आरक्षण मागवं. त्याला आमचा विरोध नाहीच. मात्र ओबीसी प्रवर्गाऐवजी स्वतंत्र आरक्षण मागावं अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे. मराठा समाज अशा मागणीसाठी आंदोलन करीत असेल तर देशभरातील ओबीसी त्यांच्या पाठीशी नक्की उभा राहिल, असे भीरड म्हणाले. ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे त्याला बळी पडू नये असं आवाहनही ओबीसी महासंघाकडून करण्यात आलय.

येत्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत मराठा समाजानं संपूर्ण ताकदीनं फक्त ओबीसी व अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे उमेदवार निवडून द्यावे. तेच मराठा समाजाला आरक्षण मिळवुन देतील असा दावाही ओबीसी महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने करण्यात आला. महासंघाचे कार्याध्यक्ष ॲड. संतोष राहाटे आदी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी बोलताना अॅड. राहाटे म्हणाले की, कुठलेही शासन कोणाची जात किंवा समाज बदलू शकत नाही. दुसऱ्या जातीला तिसऱ्याचे नाव सुध्दा देऊ शकत नाही. या शासनाची भूमिका सर्व मराठ्यांना कुणबी संबोधणे आणि त्यामार्फत मराठ्यांना आरक्षण देणे हे चुकीचे धोरण आहे. त्यामुळेच ते कायदेशीर न टिकणारे आहे. मराठा समाजाला फसविण्याचा हा एक नवा प्रकार आहे. त्यामुळे आधीपासूनच आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक असलेल्या ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गाच्या उमेदवारांनाच अधिक पसंती द्यावी. ईतर कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये. मराठा समाजानं शांत राहुन आंदोलन करावं. गरज भासल्यास ओबीसी समाजातील नेत्यांना चर्चेसाठी बोलवावं. ते देखील आरक्षण मिळविण्यासाठी योग्य ते सहकार्य मराठा समाजाला करतील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

(Edited by : Prasannaa Jakate)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT