Manoj Jarange Patil Sarkarnama
विदर्भ

Maratha Reservation News : मनोज जरांगे पाटील तर सरकारवर तुटूनच पडले, म्हणाले...

Manoj Jarange Antarwali Sarati sabha : हा जरांगे पाटील आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे.

संदीप रायपूरे

Manoj Jarange Bhashan : सरकारकडे आता केवळ १० दिवस उरले आहेत. या दहा दिवसांत जर शासनाने निर्णय दिला नाही, तर हा जरांगे पाटील आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे. आता मागे हटायचं नाही मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय हा जरांगे पाटील शांत बसणार नाही, असा निर्वाणीचा इशारा जरांगे पाटलांनी दिला. (They should note that this is Jarange Patil)

मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करून मराठ्यांना कुणबी समाजाचे प्रमाणपत्र द्या. कारण राज्यात सर्वात मोठा समाज मराठा आहे. मात्र सरकारकडून मराठा समाजाची उपेक्षा केली जात आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गठीत केलेल्या समितीच काम बंद करा. तुमचं आमचं जे ठरलं होतं, तसं होऊ द्या. मराठ्यांना ओबीसीत समावेश करण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने तातडीने घ्यावा, असेही जरांगे म्हणाले.

मराठ्यांविरोधात आग ओकू नका

मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांनी मोठं आंदोलन उभारलं होत. या आंदोलनाची शासनाने दखल घेतली होती. पण सरकार आपल्या शब्दावर ठाम नाही. आता सरकारकडे केवळ १० दिवस उरले आहेत. या दहा दिवसांत सरकारने आपला निर्णय घेतला नाही, तर मी जरांगे पाटील आहे. हेसुद्धा सरकारने समजून घ्यावे. राज्यात मराठ्यांच्या विरोधात आग ओकण्याचं काम बंद करा.

राज्यात मराठ्यांनीच १०६ आमदार निवडून दिले आहेत. केंद्रात आणि राज्यातील सरकार आणण्यासाठी मराठ्यांची मोठी भूमिका राहिली आहे. जर तुम्ही आम्हाला आरक्षण दिले, तर तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू, असे जरांगे म्हणाले. आरक्षणाचा दिवस जवळ आला आहे. आपण २४ ऑक्टोबरपर्यंत आरक्षण दिलं नाही, तर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू. आंदोलन शांततेतच होईल.

आरक्षणाशिवाय एक इंचही मागे हटणार नाही

शांततेच्या माध्यमातून ‘एक मराठा लाख मराठा’ ही ताकद निर्माण झाली आहे. दहा दिवसांत आरक्षण मिळाले नाही, तर पुढची जबाबदारी सरकारची असेल, असा इशाराही त्यांनी दिला. आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी एक इंचही मागे सरकार नाही आमरण उपोषण करून एकतर माझी अंत्ययात्रा निघेल, नाहीतर मराठ्यांच्या आरक्षणाची विजययात्रा निघणार.

दहा दिवसांत निर्णय द्या, अन्यथा आता आरपारची लढाई लढू मरू किंवा जिंकू, असेही जरांगे पाटील म्हणाले. दहा दिवस गाफील राहू नका. आता मराठ्यांना आलेली संधी वाया जाऊ देऊ नका. आपल्यात फूट पाडण्याचे प्रयत्न होतील. त्यामुळे हे दहा दिवस आपणास अतिशय महत्वाचे आहेत. मराठ्यांनो उद्रेक करू नका, शांततेतच आंदोलन करू, असेही जरांगे पाटील म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT