Maratha Survey  Sarkarnama
विदर्भ

Maratha Survey Started : ॲपमध्ये केवळ 'महार' जातीचा रकाना; बौद्धांचा खुल्या प्रवर्गात समावेश, वंचितची 'ही' भूमिका !

जयेश विनायकराव गावंडे

Akola Politics : राज्यातील मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी 23 जानेवारीपासून सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे. अकोला शहरातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण अकोल्यात सुरू झाले आहे. या सर्वेक्षणासाठी अकोला शहरातील 1650 शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

या सर्वेक्षणाला सुरुवात झाली खरी, मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे सर्वेक्षण करण्यात मोठी अडचण निर्माण होत आहे, तर दुसरीकडे अनेक शिक्षकांनी या सर्वेक्षणाला उपस्थित न होता कारण देत आपली नावं यातून वगळली आहेत, तर नवीन शिक्षकांची नोंदणी करण्यात आली आहे, तर दुसरीकडे या सर्वेक्षणात जातगणनेत बौद्ध खुल्या प्रवर्गात दाखवत असल्याचा आरोप करीत आकडेवारीतही ऑनलाइन घोळ झाल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे जात असतानाच मागासवर्ग आयोगाने तातडीने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे यासंदर्भातील सूचना प्रकाशित करण्यात आलेली असून 23 ते 31 जानेवारी 2024 या आठ दिवसांच्या काळात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांच्या घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

अकोला शहरात या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. या सर्वेक्षणासाठी अकोला शहरातील 1650 शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.

मराठा समाजाचे आर्थिक व सामाजिक मागासलेपण तपासण्याच्या उद्देशाने राज्य मागासवर्ग आयोगाकडून दीडशेच्यावर प्रश्न टाकण्यात आले आहेत. या प्रश्नांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकडून माहिती घेण्यात येणार आहे, तर मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाची संख्या पाहता हे सर्वेक्षण एवढ्या कमी कालावधीत पूर्ण करणं हे शासकीय यंत्रणेसमोरचं एक मोठं आव्हान आहे. एका सर्वेक्षणासाठी अर्ध्या तासापेक्षा जास्त कालावधी लागत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आठ दिवसांत हे सर्वेक्षण पूर्ण होईल की नाही, याची शाश्‍वती आज कुणालाही नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हे सर्वेक्षण करताना जातीच्या यादीमध्ये 'बौद्ध' नमूद नसल्याने वंचितकडून तक्रार करण्यात आली आहे. इतर सर्व जाती असताना या ॲपमध्ये केवळ 'महार' जातीचा रकाना घालण्यात आला असून बौद्ध नमूद केल्यास खुल्या प्रवर्गात समाविष्ट होत असल्याचे वंचितचे म्हणणे आहे.

प्रगणकाने केवळ 18 घरांचा सर्व्हे केलेला असताना त्यात 54 घरांचा सर्व्हे केल्याची आकडेवारी येत असल्याने हा घोळ जाणिवपूर्वक बौद्ध खुल्या प्रवर्गात टाकून ह्या आकडेवारीचा वापर राजकीय आरक्षण आणि लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणारे लाभ घालविण्यासाठी केला जाणार असल्याची तक्रार वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी राज्य मागासवर्ग आयोग आणि मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

Edited By : Atul Mehere

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT