Navnit Rana
Navnit Rana Sarkarnama
विदर्भ

Navnit Rana : तरुणाचा दोन मुलींशी विवाह : नवनीत राणा म्हणतात, कायदा बनवा...

सरकारनामा ब्यूरो

Winter Session of Parliament : सोलापूरमध्ये एका तरुणाने दोन मुलींसोबत एकाच मंडपात विवाह केला. या विवाहाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताच सर्वत्र खळबळ उडाली आणि सर्व स्तरांतून प्रतिक्रिया येऊ लागल्या. याबाबत अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत आवाज उठवला आहे.

यासंदर्भात बोलताना खासदार राणा (Navnit Rana) म्हणाल्या, भादंवि ४९४, ४९५ हे कायदे सध्या अस्तित्वात आहेत. पण एका व्यक्तीने एकाच मंडपात दोन मुलींशी विवाह करावा, असा कुठलाही कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे यासाठी कायदा (Law) तयार केला पाहिजे आणि सोलापूरमध्ये (Solapur) ज्यांनी हा प्रकार केला त्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे. कारण आपल्या संस्कृतीसाठी हा मोठा धक्का आहे. सर्व सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून हा विषय देशभर व्हायरल झाला आहे. युवक - युवतींवर त्याचा विपरीत परिणाम होतो आहे. यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय व्हावा.

सोलापुरात घडलेली ती घटना निश्‍चितच स्वीकारण्यासारखी नाही. त्या तरुणावर नंतर कारवाईसुद्धा करण्यात आली. पण येवढ्यावरच थांबून चालणार नाही. देशाने या घटनेची दखल घेतली आहे आणि गांभीर्याने विचार केला पाहिजे. यापुढे असा प्रकार घडू नये आणि आपल्या संस्कृतीला गालबोट लागू नये. म्हणून कठोर कायदा तयार करण्याची आज गरज आहे. जेणेकरून पुन्हा कुणी असे धाडस करणार नाही, असे खासदार राणा म्हणाल्या.

देशातील ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेच्या तिकीट शुल्कामध्ये यापूर्वी जी सवलत दिली जात होती. त्याची सवय सर्वांना झाली आहे. श्रावणबाळ आणि निराधार योजनांचा लाभ घेणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना या योजनांपासून वंचित राहावे लाग आहेत. या योजना पूर्णपणे केव्हा सुरू होतील, असाही प्रश्‍न अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सभागृहात केला होता. त्यावर जवळपास ५९ हजार कोटी रुपयांची सबसिडी दिलेली आहे. काही राज्यांचाही बजेट येवढा नसतो. तेवढे अनुदान आपण प्रवाशांच्या सोयीसाठी दिलेला आहे. रेल्वेच्या पेंशनचे बिल ६० हजार कोटी रुपयांचे आहे. वेतनाचे बिल ९७ हजार कोटी रुपये आहे. अशा परिस्थितीत ५९ हजार कोटी रुपये सबसिडी दिली जात आहे, ती स्वीकारली गेली पाहिजे, असे उत्तर रेल्वेमंत्री अश्‍वीन वैष्णव यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT