Health Recruitment : 
विदर्भ

Health Recruitment : प्रतिक्षा संपली! आरोग्य विभागात मेगा भरती ; तानाजी सावंताची मोठी घोषणा

गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या आरोग्य विभागाच्या जागांसाठी नवीन वर्षात भरती केली जाणार आहे.

सरकारनामा ब्युरो

Nagpur : आरोग्य विभागातील जागा भरण्यासाठी जानेवारीमध्ये जाहिरात काढण्यात येणार आहे, त्यासाठी बिंदुनामावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी राज्यातील आरोग्य विभागातील भरती विषयी विचारलेल्या प्रश्नांवर मंत्री सावंत यांनी उत्तरे दिली. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उप केंद्र ही जिल्हा रुग्णालयासारखी मोठी झाली आहेत. डाॅक्टरही तिथेच राहतात. या आरोग्य केंद्रांसाठी पाच ते दहा कोटींचे प्रस्ताव आलेले असतात.पण तेथिल पदेच रिक्त राहिली तर गरिबांना त्याचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारकडे यासाठी निधी आहे का? केंद्र शासनाने यासाठी मदत कशी करणार? आरोग्य केंद्रांवर येथे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध होणार आहे का?, असे सवाल आमदार शिंदे यांनी उपस्थित केले.

गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या आरोग्य विभागाच्या जागांसाठी नवीन वर्षात भरती केली जाणार आहे. विशेष म्हणजे कंत्राटी तत्त्वावर असणाऱ्या एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेतले जाणार आहे. केंद्र सरकारने शिक्षण व आरोग्यावर अधिकाधिक निधी खर्च करण्याच्या सूचना दिल्या असून त्यानुसार अधिकाधिक निधीची तरतुद केली जाणार आहे. आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, प्रथम श्रेणी अधिकारी, क व ड संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी येत्या पंधरा दिवसांत त्याची जाहिरात काढली जाईल आणि त्यानुसार भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असंही सावंत यांनी म्हंटल आहे.

त्यानंतर , सोलापूर जिल्ह्यातील ७७ आरोग्य केंद्रे असून उप केंद्रांचेही काम सुरु आहे. तिथेही पद निर्मिती करण्यात येईल. तसेच कर्माळा येथील उप केंद्र तयार आहे. तेथे पद निर्मिती झालेली नाही, असे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. त्यावर सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत, खुलताबादसह दौलताबाद, वेरूळ, म्हैसमाळ, सुलीभंजन ही पर्यटन आणि धार्मिक स्थळे असल्याने खुलताबादमध्ये ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचेही मंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT