Uday Samant Marathi Latest News
Uday Samant Marathi Latest News sarkarnama
विदर्भ

आत्ताच मंत्रिपदाचा राजीनामा देतो! संतप्त उदय सामंतांचं खुलं आव्हान

सरकारनामा ब्युरो

नागपूर : आजपर्यंत शिवसेनेच्या (Shivsena) एखाद्या मुलाला प्रवेश द्या किंवा नोकरी द्या म्हणून मी संपर्क केला असेल तर सांगा, आत्ताच पदाचा राजीनामा देतो, असं खुलं आव्हान उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिलं. मात्र, छत्रपतींच्या राज्यात दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून मी कायम चांगल्या गोष्टींसाठी हस्तक्षेप करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या (बाटू) नागपूर येशील उपकेंद्राच्या उद्‍घाटनप्रसंगी सामंत बोलत होते. ते म्हणाले की, निवृत्तीनंतर काही कुलगुरूंनी आरोप केला की मी विद्यापीठामध्ये हस्तक्षेप करतो. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, स्वतःच्या वेतनाची किंवा कुलसचिवांची थकबाकी असेल तर मंत्र्याची मदत हवी असते. पण चांगल्या गोष्टीसाठी मी सूचना केल्या की लगेच हस्तक्षेपाचा आरोप होतो.

पुणे विद्यापीठात मागील अनेक वर्षांपासून पडून असलेली छायाचित्रे भिंतीवर लावण्याची सूचना मी केली. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटची जागा वाचवण्यासाठी प्रयत्न केला. हा शिक्षणमंत्र्यांचा हस्तक्षेप ठरतो का? विद्यापीठाच्या अनेक प्राधिकरणामध्ये होणाऱ्या कुठल्याही निर्णयात मी दखल दिलेली नाही. त्या समित्यांवर असणाऱ्यांची नावेही मला माहिती नाही. तरीही हस्तक्षेपचा आरोप असेल तर तो साफ खोटा आहे. विद्यापीठात राजकारण न करता केवळ विद्यार्थी हाच प्रमुख घटक मानावा, असेही सामंत यांनी सांगितलं.

नागपूर शासकीय तंत्रनिकेतनच्या पदवीदान सोहळ्यात बोलताना उदय सामंत म्हणाले की, दीक्षांत सोहळ्याचा वेळ कमी करायला हवा. इंग्रज गेले आता आपण आपली प्रथा सुरू करूयात. दीक्षांत मिरवणूक ही विद्यार्थ्यांची असावी. लांबलचक कार्यक्रम असल्यानं अनेकांना झोपा येतात. इंग्रजांनी आखून दिलेली दीक्षांतची पद्धत बंद करून पुढील वर्षांपासून मराठमोळ्या पद्धतीने पदवीदान सोहळा होईल. दीक्षांत सोहळा हा कार्यक्रम उत्साहाचा, तरुणांचा असावा. याचबरोबर आता ऑनलाइनच्या मानसिकतेतून विद्यार्थ्यांना बाहेर काढावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT