Ajit Pawar, Devendra Fadanvis and Amol Mitkari Sarkarnama
विदर्भ

Mitkari's Warning To Fadnavis : मिटकरींचा फडणवीसांना थेट इशारा; म्हणाले गोप्यासारख्या रानडुकराला आवरा, अन्यथा...

जयेश विनायकराव गावंडे

Akola Political News : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेला आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोप्यासारख्या रानडुकराला आवर घालावा, अन्यथा आम्हाला आवर घालणे कठीण होईल, अशा कडक शब्दांत उत्तर दिलं आहे. (Gopichand Padalkar's statement is likely to create a new controversy in the state)

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अजित पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याने राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू’, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. तसेच ‘सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक’, अशीही जहरी टीका पडळकर यांनी केली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना पडळकर यांनी ही टीका केली आहे.

भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर यांनी यापूर्वीही शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यामुळे पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यातील वाद हा नवा नाही. मात्र, आता अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत.

त्यामुळे एकीकडे भाजपसोबत अजित पवार गटाने हातमिळवणी केली आणि दुसरीकडे अजित पवार यांच्यावर भाजप आमदार पडळकर यांनी खोचक शब्दांत टीका केल्याने हा वाद आणखी भडकण्याची शक्यता आहे. आता या वादात आमदार अमोल मिटकरी यांनी उडी घेत थेट पडळकर यांना रानडुकराची उपमा देऊन देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना आवर घालण्याचे आवाहन केले आहे.

काय म्हणाले अमोल मिटकरी ?

विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक समजले जातात. अजित पवार यांच्यामुळेच अमोल मिटकरी यांना आमदारकी मिळाली. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर मिटकरी हे अजित पवार गटात सामील झाले. आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांंच्यावर थेट टीका केल्याने मिटकरींनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

'गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला नम्रतापूर्वक विनंती करतो. तुमचा पालतू कुत्रा हा औकातीच्या बाहेर भुंकला आहे. ज्याची ख्याती मंगळसूत्रचोर अशी आहे. जो समाजाचा होऊ शकला नाही. जो सख्ख्या भावाचा होऊ शकला नाही. देवाचाही होऊ शकला नाही, त्याला तुम्ही वेसण घाला, अन्यथा याला वेसण घालण्याची क्षमता अजित पवार यांच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे.

अजित पवारांच्या विरोधात निवडणुकीत उभा राहिल्यानंतर बारामतीकरांनी त्याला त्याची लायकी दाखवून दिली आहे. तुम्ही जर आवर घालत नसाल तर आम्हालाही आवरणे तुम्हाला कठीण होईल, ही आमची सूचना आणि इशारा असल्याचं मिटकरी यांनी म्हटलं आहे.'

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT