Bacchu Kadu
Bacchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Bachhu Kadu : ''...तर पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे तोंड रंगवणार!''; बच्चू कडूंचा इशारा

सरकारनामा ब्यूरो

अमरावती : अपक्ष आमदार बच्चू कडू हे विविध प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत असतात.आता त्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या बाजूने ते मैदानात उतरले आहे. पीक विमा कंपन्यांबाबत कठोर भूमिका घेत जर येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांचे मुंबईत येऊन तोंड रंगवण्यात येईल असा गर्भित इशारा आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी दिला आहे.

अमरावती येथे आमदार बच्चू कडू यांनी पीक विमा कंपन्यांसंबंधीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. कडू म्हणाले, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यास विमा कंपन्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. तसेच विम्याच्या रकमेचे असमान वाटप होताना दिसत आहे. शेजारी-शेजारी शेती असूनही नुकसानभरपाईच्या रकमेत मोठी तफावत दिसून आली आहे. नुकसानीनंतर पूर्वसूचना देणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ २५ टक्के अग्रिम देणे आवश्यक होते. पण, ही रक्कम देण्यात आली नाही.

अमरावती जिल्ह्यातील सुमारे १ लाख १७ हजार शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम मिळणे आवश्यक होते. पण, ते विमा कंपनीने दिलेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेचे पालन झालेले नाही. ८१ मंडळांमध्ये नुकसान भरपाई प्रस्तावित असताना विमा कंपनीने केवळ ९ मंडळे गृहीत धरल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे जर येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांना न्याय न मिळाला नाही तर अधिकाऱ्यांचे तोंड रंगवू असा इशारा कडू यांनी दिला आहे.

संजय देशमुख यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे मंगेश देशमुख, जिल्हाध्यक्ष प्रवीण हेंडवे, महानगर प्रमुख बंटी रामटेके, योगेश लोखंडे, रणजित खाडे, योगेश भुसारी आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT