Bacchu Kadu, Ravi Rana.
Bacchu Kadu, Ravi Rana. Sarkarnama
विदर्भ

रवि राणा निमित्त : बच्चू कडूंचे खरे दुखणे मंत्रिपदाचे?

सरकारनामा ब्यूरो

अमरावती : आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मध्यस्थी केल्यानंतर राणांनी दिलगिरी व्यक्त करत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून दिव्यांग बांधवाच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये आयोजित मेळाव्यात भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

या वेळी कार्यकर्त्यांनी भूमिका मांडली. त्यामध्ये दिव्यागांना स्वतंत्र मंत्रालय मिळावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांना सत्तेमध्ये सामावून घेऊन त्यांना अल्पसंख्याक मंत्रालयाची जबाबदारी द्यावी. त्याच बरोबर त्यांना स्वतंत्र दिव्यांग मंत्रालया मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

राज्यभरातील प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आज आमरावतीमध्ये मोठे शक्तीप्रदर्शन केले. त्यामध्ये दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी बच्चू कडू यांची भूमिका जाहीर केली. भूमिका जाहीर करताना त्यांनी मंत्रीपदाची मागणी केली. त्यामुळे रवी राणा निमित्त आहेत, बच्चू कडू यांनी मंत्रीपदासाठी शक्तीप्रदर्शन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

या वेळी बच्चू कडू म्हणाले, प्रहार काही आंडू पांडूचा पक्ष नाही आहे. संख्येने कमी असलो तरी बाजी आहोत. आम्ही कोणाच्या वाटाल्या जात नाही. कोणी वाट्याला गेले तर त्याचा कोथळा काढल्या शिवाय राहत नाही, असा इशारा त्यांनी दिला. विनाकारणा तोंड माराल, तर आम्ही तोंड रंगवल्याशिवाय राहणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

सत्तेची आम्हाला पर्वा नाही आहे. मी २० वर्ष ३५० गुन्हे घेऊन प्रवास केला आहे. मी जेव्हा निवडणुकीला बाहेर पडतो, तेव्हा कोणत्या बिल्डराच्या घरी जात नाही. आम्ही मंदिर, मशीद, धर्म, जातीचे राजकारण करत नाही. गोरगरीब, अपंगांसाठी आम्ही रक्ताचे पाणी केले, त्यांचा कधी राजकारणासाठी वापर केला नसल्याचेही त्यांनी सांगितले. राजकारण आणि तत्त्वांची सांगड घालता आली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT