Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

आमदार बावनकुळे सतीश उकेंवर ५० कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार...

ते आरोप करणारे आणि त्यांना तसे करायला लावणारे, सर्वांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : गेल्या ८ दिवसांपासून राज्यात जे काही राजकीय वातावरण तापलेले आहे, त्यातूनच सतीश उके नामक वकिलाने माझ्या बदनामीचा प्रकार केला. कुणाच्या घरात कलह निर्माण करायचा, नातेवाइकाला पकडायचे, भडकवायचे आणि खोटेनाटे आरोप करायचे, हे योग्य नाही. सतीश उके यांच्यावर ५० कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीचा दावा करणार आणि फौजदारी गुन्हासुद्धा दाखल करणार आहे, असे भाजपचे (BJP) प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले.

ॲड. सतीश उके यांनीच हे सर्व घडवून आणले आहे. सतीश उकेंचा बोलविता धनी वेगळाच आहे. योग्य वेळ आल्यावर त्याचाही खुलासा करणार आहे. नुकतीच मी विधान परिषदेची निवडणूक लढलो. त्यावेळी माझी संपत्ती किती, हे मी जाहीर केले आहे माझ्या किती फौजदारी गुन्हे दाखल आहेत, हेसुद्धा जाहीर केले आहे. माझ्या एबी फॉर्मसोबत सर्व आवश्‍यक कागदपत्रे लागलेली आहेत. त्यानंतर माझ्याकडे हजारो कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा जो आरोप करण्यात आहे, तो धादांत खोटा आहे. ते आरोप करणारे आणि त्यांना तसे करायला लावणारे, सर्वांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे आमदार बावनकुळे म्हणाले.

ज्या कंपन्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप लावण्यात आलेला आहे. तर त्या कंपन्या कधी ना कधी माझ्यापासून त्रस्त झाल्या असतील. मग आजतागायत त्यांपैकी एकाही कंपनीने का आरोप केला नाही. माझा नातेवाईक असलेल्या त्या मुलाला गळाला लावणे आणि त्याच्याकडून काहीबाही वदवून घेणे, असा हा प्रकार आहे. उद्या कुणीही उठेल आणि काहीही आरोप करेल, याला काही अर्थ नाही. पण माझा नातेवाईक असलेल्याला सुरज तातोडेला फूस लावून त्याला भ्रमीत करण्यात आलेले आहे, हे मात्र नक्की. गेल्या ८ ते १० दिवसांपासून जे राजकीय एपीसोड्स सुरू आहेत, त्यानंतर तो प्रकार घडला असल्याचेही आमदार बावनकुळे यांनी सांगितले.

खरे पाहता राजकारण करीत असताना येवढ्या खालच्या स्तरावर कुणी जाऊ नये. परिवारातील एखादा नातेवाईक पकडून, त्याच्या मानसीक स्थितीचा फायदा घेऊन त्या नातेवाइकाकडून वाट्टेल तसे आरोप करवून घेणे चुकीचे आहे. माझ्या निवडणुकीच्या वेळी शपथपत्रात नमूद केल्यच्या व्यतिरिक्त टाचणीभरही संपत्ती माझ्याकडे जास्त आढळली, तर कुणी मला दाखवून द्यावी. राहिला प्रश्‍न माझ्या या राहत्या घराचा तर आरोप करणाऱ्यांनी सांगावे की हे घर तेवढ्या रुपयांचे आहे. मी त्यांना रजिस्ट्री करून द्यायला तयार आहे, असे आमदार बावनकुळे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT