Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule sarkarnama
विदर्भ

आमदार बावनकुळे म्हणाले, आजही निवडणूक झाली, तरीही भाजप सज्ज !

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : भाजप राज्यात बूथ सक्षमीकरण अभियान राबविणार आहे. एका बुथवर ३० कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात येईल. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या ‘घर घर तिरंगा, हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत भाजप कार्यकर्ते घरोघरी राष्ट्रध्वज उपलब्ध करून देणार असल्याचे माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितले.

राज्यात 97 हजार 443 बूथ आहेत. प्रत्येक बूथवर 30 प्रमुख कार्यकर्त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Narendra Modi) गृहमंत्री अमित शहा, (Amit Shaha) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J.P. Nadda) यांच्या उपस्थितीत भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. प्रदेश भाजप कार्यकारिणीची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह 900 प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडल्याचे आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले. आता राज्यभरातील जिल्ह्यातील हजार पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी महिनाभरात जाहीर होईल, त्यानंतर तालुकास्तरावर कार्यकारिणी जाहीर केली जाईल, असे आमदार बावनकुळे म्हणाले. ही निवडणुकीची तयारी नाही तर प्रक्रिया आहे. आम्ही तयारी करीत नाही, तर नेहमी तयारच असतो. अगदी आजही निवडणूक झाली तरीही आम्ही तयार आहोत, असेही ते म्हणाले.

या उपक्रमातून बूथ सक्षमीकरण अभियान राबविण्यात येणार असल्याचे आमदार बावनकुळे यांनी नमूद केले. याशिवाय ‘घर घर तिरंगा, हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भाजप कार्यकर्ते प्रत्येक घरी झेंडा उपलब्ध करून देतील. 13 ते 15 ऑगस्टदरम्यान भाजप कार्यकर्ते संपूर्ण राज्यभर ही मोहीम राबविणार आहेत. बूस्टर डोससाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. परंतु भाजप कार्यकर्तेही या मोहिमेत भाग घेणार आहे. भाजपने नेहमीच जनहिताला प्राधान्य देत संघटनेवर भर दिला आहे. ही नेहमीची प्रक्रिया असल्याचे ते म्हणाले.

कोणत्याही निवडणुकीसाठी भाजप सज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी चारशेवर लोकसभेच्या जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने तसेच राज्यातही केव्हाही निवडणूक झाल्यास भाजप सज्ज असल्याचे आमदार बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT