MLA Narendra Bhondekar and Eknath Shinde Sarkarnama
विदर्भ

एकनाथ शिंदेंच्या बंडाने हिरावले आमदार भोंडेकरांचे महामंडळ...

नरेंद्र भोंडेकर (MLA Narendra Bhondekar) यांनी भाजप-सेना युतीच्या उमेदवाराला न जुमानता भंडारा- विधानसभा क्षेत्रासाठी अपक्ष आमदार म्हणून निवडणूक लढविली.

Abhijit Ghormare_Guest

भंडारा : आज महाराष्ट्रात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यामुळे राजकीय भूकंप आला. यामध्ये घडत असलेल्या राजकीय घडामोडीत मोठे नुकसान झाले आहे. काही आमदारांचेही नुकसान झाले आहे. यामध्ये भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या क्रमांक कदाचित वरचा असावा.

आज विदर्भ पाटबंधारे या महामंडळावर त्यांची नियुक्ती होणार होती. शिवसेनेला मत देण्यासाठी त्यांना हे बक्षीस मिळणार होते. मात्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाने भोंडेकरांचे महामंडळ जवळपास हिरावले गेले. आता त्यांना हे महामंडळ मिळण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. त्यामुळे ते सध्या नाराज असल्याचे बोलले जात आहे. नरेंद्र भोंडेकर (MLA Narendra Bhondekar) यांनी भाजप-सेना युतीच्या उमेदवाराला न जुमानता भंडारा (Bhandara) विधानसभा क्षेत्रासाठी अपक्ष आमदार म्हणून निवडणूक लढविली. यात त्यांनी आमदारपदाची माळ गळ्यात पाडून घेतली. मी अपक्ष म्हणून जरी निवडणूक लढविली असली तरीही मी अजूनही शिवसेनेत असल्याचे भोंडेकर नेहमीच बोलत असतात.

महाविकास आघाडी सरकार तयार झाले तेव्हा पक्षासोबत प्रामाणिक राहिल्याची परतफेड म्हणून मंत्रिपद मिळेल, अशी आशा भोंडेकर यांना होतीच. मात्र तेव्हा त्यांचा हिरमोड झाला होता. त्या काळात शिवसेना नेत्यांशी त्यांनी दुरावा निर्माण केला होता. राज्यसभा निवडणुकीपासून अपक्ष आमदारांचे महत्व वाढू लागल्याने अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकरांना अच्छे दिन येऊ लागले होते. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारचे मित्र असलेल्या अपक्ष आमदारांची मते फुटली होती. त्याचा धसका महाविकास आघाडीने घेतला. त्यातही शिवसेनेला संजय पवार यांचा पराभव जिव्हारी लागला.

विशेष म्हणजे राज्यसभा निवडणुकीत नरेंद्र भोंडेकर यांचेही मत फुटल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे शिवसेनेने आपल्या पक्षाशी समर्पित असलेल्या आमदारांना जवळ करण्यात सुरुवात झाली. नाराज अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांना चक्क विदर्भ पाटबंधारे महामंडळाची ऑफर दिली गेली होते. त्यामुळे भोंडेकर यांच्या रूपाने भंडारा जिल्ह्याला लवकरच राज्यमंत्री दर्जाचे पद मिळणार अशी आशा होती. काल विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर ज्या घडामोडी झाल्या, त्यानंतर ही शक्यता मावळ्याचे चित्र दिसते आहे.

काल विधान परिषद निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला मतदान करून त्याला निवडून भोंडेकर यांनी पक्षप्रमुख उद्भव ठाकरे यांची मर्जी राखली होती. त्याचे फळ म्हणून आज मंगळवारी विदर्भ पाटबंधारे महामंडळासाठी त्यांच्या नावाची घोषणा होणार होती. मात्र अचानक राजकीय समीकरणे बदलल्याने त्यांना अजून वाट पाहावी लागणार आहे. दुसरीकडे भाजप सोबत एकनाथ शिंदे यांचा गट सत्ता स्थापन करणार, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे भोंडेकर यांना महामंडळ मिळेल का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. भोंडेकर हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांच्या महामंडळाला धोका नसल्याचेही सांगितले जात आहे. मात्र या सर्व घडामोडींना उशीर लागणार असल्याने तूर्तास भोंडेकर यांना महामंडळासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT