Chandrashekhar Bawankule and Raj Thackeray
Chandrashekhar Bawankule and Raj Thackeray Sarkarnama
विदर्भ

आमदार चंद्रशेखर बावनकुळेंनी 'या'साठी घेतली राज ठाकरे यांची भेट...

अतुल मेहेरे

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते राज्याचे माजी ऊर्जा मंत्री, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. तेथे अर्धा ते पाऊण तास उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. पण या चर्चेत एकही राजकीय विषय नव्हता, तर आमदार बावनकुळेंचे चिरंजीव संकेत यांचा विवाह येत्या २७ मे रोजी होऊ घातला आहे. त्या विवाह सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचे आमदार बावनकुळे यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले. या भेटीमध्ये राजकीय विषयांवर चर्चा झाली नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

संकेत चंद्रशेखर बावनकुळे यांचा विवाह पुणे येथील उज्वला व राजेंद्र पवार यांची कन्या अनुष्का हिच्यासोबत २७ मे रोजी होऊ घातला आहे. त्यामुळे बावनकुळे यांच्याकडे सध्या लगीनघाई सुरू आहे. आमदार बावकुळे लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटण्यात व्यस्त आहेत. यासाठीच आज त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्याकडील विवाह सोहळ्याला महाराष्ट्रातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांची मंडळी येणार असल्याची माहिती आहे. आज फक्त लग्नाचे निमंत्रण देणे, येवढाच विषय होता, असे आमदार बावनकुळे म्हणाले.

उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. त्याशिवाय युपीच्या लोकांवरही मनसेकडून हल्ले चढवण्यात आले होते. वडापावच्या गाड्या उलथवून दिल्या होत्या. त्यामुळे उत्तरप्रदेशातील भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही, असा ईशारा दिला आहे. आधी त्यांच्या कृत्यासाठी ठाकरेंनी माफी मागावी, असेही खासदार सिंह यांनी म्हटले आहे.

‘तो’ निर्णय राज ठाकरे घेतील..

याबाबत आमदार बावनकुळेंना विचारले असता, ते म्हणाले, राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला जे खासदार विरोध करत आहेत, त्याबद्दल काय करायचे, ते राज ठाकरे बघतील. माझा विषय तर केवल लग्नाचे निमंत्रण देणे येवढाच होता. भाजपचे एक खासदार राज ठाकरेंना विरोध करीत असले तरी विधानसभेतल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे राज यांच्या अयोघ्या दौऱ्यासाठी अनुकूल आहेत. भाजपचे खासदार बृजभूषण सिंग यांनी सबुरीने घेताना ‘रामाच्या चरणी जो जात असेल त्याला जाऊ द्यावे, विरोध करण्याचे काहीच कारण नाही’ असे म्हणत ठाकरेंच्या अयोध्या दौराचे समर्थन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT