Devendra Bhuyar | Sharad Pawar Sarkarnama
विदर्भ

"तर विधान परिषद-राष्ट्रपती निवडणुकीत विचार करावा लागेल" : आमदार भुयार यांचा इशारा

Devendra Bhuyar | Sharad Pawar | NCP : मी लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादीसोबत आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यातील राज्यसभा निवडणुकीचे (Rajya Sabha Election) निकाल नुकतेच जाहीर झाले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपचे (BJP) ३ आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) ३ उमेदवार निवडून आले. शिवसेनेच्या संजय पवार यांना परावभ स्विकारावा लागला. मात्र पवार यांच्या या पराभवानंतर महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळतं आहे.

शिवसेनेकडून (Shivsena) पवारांच्या पराभवाचे खापर अपक्ष आमदारांवर फोडलं जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर जाहीरपणे ६ आमदांराचे नाव घेतले. यात 'बविआ'चे ३ आमदार, अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, संजय शिंदे आणि श्यामसुंदर शिंदे यांचा समावेश आहे. राऊत यांनी जाहीरपणे नावांचा उल्लेख केल्याने महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या या अपक्ष आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याच नाराजीमधून आमदार देवेंद्र भुयार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि संजय राऊत यांची भेट घेतली.

शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटीनंतर बोलताना भुयार यांनी महाविकास आघाडीला आणि त्यातही विशेषतः शिवसेनेला इशारा दिला. आमदार भुयार म्हणाले, शिवसेनेकडून पराभवाचं खापर माझ्यावर फोडलं जात आहे. पण याविषयावर खुलासा करण्याची माझी मागणी आहे. आम्हाला बदनाम करण्याचा आणि लोकांच्या नजरेत खाली पाडण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे मी लगेच मतदार संघात जाऊन पुन्हा मुंबईत आलो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेणार आहे. मी लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादीसोबत आहे. माझ्यावर शंका घ्यायचा प्रकार व्हायला नको होता, अशी खंतही देवेंद्र भुयार यांनी बोलून दाखविली.

याशिवाय मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवर यांच्या "यापुढे अपक्षांना निधी मिळणार नाही" या विधानावर बोलताना आमदार भुयार म्हणाले, निधी मिळाला नाही तरी चालेल. आम्ही आमच्या कामासाठी नाही तर लोकांच्या कामासाठी निधी मागतो, आणि निधी देणार नाही असं असेल तर मतही मागू नका. आगामी काळात विधान परिषदेची निडणूक आहे, राष्ट्रपतीपदाची देखील निवडणूक आहे, त्यावेळी मला विचार करावा लागेल, असा इशाराही भुयार यांनी दिला. मात्र शेवटला त्यांनी आपण महाविकास आघाडीसोबत कायम असल्याचेही स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT