नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal District) आर्णी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप धुर्वे (MLA Sandeep Dhurve) यांनी विधानसभेत जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न पोटतिडकीने मांडला. अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्यासाठी असलेला ६५ मिलिमीटरचा निकष बदलवण्याची मागणी त्यांनी काल सभागृहात केली.
आमदार धुर्वे म्हणाले, सप्टेंबर महिन्यात यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यानंतर अतिवृष्टीग्रस्त गावांमध्ये घाटंजी तालुक्यातील पारवा, शिवणी, कुर्ली, आर्णी तालुक्यातील बोरगाव, लोणबेहळ, सावळी, अंजनखेड व जवळा, वणी तालुक्यातील पुनवट, शिंदोला, झरीजामणी तालुक्यातील खडकडोह, मारेगाव तालुक्यातील मारेगाव, वनोजा देवी, कुंभा तसेच पुसद तालुक्यातील ब्राम्हणगाव, बोरी, शेंबाळपिंप्री खुर्द व खंडाळा या गावांतील मंडळांचा समावेश करण्यात आला आहे. अतिवृष्टीची नुकसान भरपाई देताना ६५ मिलिमीटरचा निकष हा फार जुना झाला आहे, तो बदलण्याची गरज आहे.
अतिवृष्टी होताना ६५ मिलिमीटरची मर्यादा ओलांडत नाही. पण पाऊस रोज पडतो, सतत पडतो. सप्टेंबर महिन्यात तेच झाले. सततच्या पावसाने जमिनीतील आद्रतेचे प्रमाण जास्त झाल्यामुळे सोयाबीनचे पीक फुटले त्याला कोंब आले आणि कपाशीची बोंडं फुटली अन् त्या बोडांनाही मग बोंड आली. यासह उडीद आणि मूग पिकाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, म्हणून २८ ऑक्टोबरला मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांनी मला चर्चेला बोलावले.
मी मांडलेली सांगितलेली परिस्थिती त्यांनी मान्य केली आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांना १० नोव्हेंबरला पाठवले. या पत्रामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लिहिले आहे की ६५ मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाला. पण सततच्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. महसूल व वनविभागाशी संबंधित १४ नोव्हेंबर २०११ मध्ये शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे फेरपंचनामे करून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई सरकारने द्यावी, अशी मागणी आमदार संदीप धुर्वे यांनी सभागृहात लावून धरली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.