Chandrapur District News : संपूर्ण राज्यात शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह सर्व विभागांतील कर्मचारी १४ मार्चपासून संपावर आहेत. याविषयी आमदार संजय गायकवाड यांनी ८० टक्के कर्मचारी भ्रष्ट असल्याचे वक्तव्य केले. त्याचा संपकऱ्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. (It has been 7 days since the strike)
आमदार संजय गायकवाडांच्या (Sanjay Gaikwad) वक्तव्याचा संपकरी कर्मचाऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे. आज तहसील कार्यालय परिसरात संपकरी कर्मचाऱ्यांनी आमदार गायकवाड यांच्या पुतळ्याचे दहन करून जाहीर निषेध केला व सरकारच्या (State Government) विरोधात घोषणाबाजी केली. तालुक्यातील सर्व विभागातील कर्मचारी १४ मार्चपासून संपावर गेले आहेत. संपाला आज ७ दिवस झाले आहेत.
तहसील परिसरात कर्मचाऱ्यांनी ठाण मांडले आहे. या आंदोलनात सर्वच विभागांतील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालये ओस पडलेली आहेत सर्वसामान्यांची कामे ठप्प झालेली आहेत. जुनी पेन्शन तथा इतर मागण्यांकरिता पुकारलेला हा लढा मागण्या पूर्ण होईपर्यंत असाच सुरू राहील असा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे.
कर्मचाऱ्यांच्या विरोधात अभद्र बोलणाऱ्या आमदारांना (MLAs) धडा शिकवण्यात येईल, असा निर्धार कर्मचारी संघटनांनी केला आहे. या राज्यव्यापी संपामध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, जुन्या पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष राजू डाहुले, पुरोगामी शिक्षक समितीचे अध्यक्ष संदीप कोंडेकर, प्रदीप पायघन, किरण लांडे, हंसराज शेंडे, आरोग्य विभाग संघटनेचे पी. ए. कामडी, सुरेश खाडे, महसूल विभागाचे रंजिता कोहपरे, वनविभागाचे संतोष कुकडे, अमोल बदखल, पंकज गावडे, अविनाश पिंपळशेंडे, सुधीर झाडे, दीपक भोपळे, श्रीकांत भोयर यांच्यासह शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.