Chandrashekhar Bawankule and Parinay Fuke. Sarkarnama
विदर्भ

Bhandara-Gondia जिल्‍ह्यांत आमदार डॉ. परिणय फुके खरा ठरवत आहेत बावनकुळेंचा दावा !

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातही भाजपने इतर पक्षांच्या समर्थीत उमेदवारांना मागे टाकले आहे.

सरकारनामा ब्यूरो

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने निम्म्यापेक्षा अधिक जागांवर झेंडा फडकावला असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला. भंडारा-गोंदिया जिल्ह्यांत त्यांचा हा दावा आमदार डॉ. परिणय फुके यांनी खरा ठरवल्याचे दिसते. नागपूर पाठोपाठ भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातही भाजपने इतर पक्षांच्या समर्थीत उमेदवारांना मागे टाकत ५५ टक्क्यांच्या जवळपास ग्रामपंचायतींवर विजय मिळविला आहे.

आमदार डॉ. परिणय फुके (Parinay Fuke) हे भंडारा- (Bhandara) गोंदिया (Gondia) जिल्ह्याचे विधानपरिषद सदस्य आहेत. प्रत्येक निवडणुकीप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुका त्यांनी फार गांभीर्याने घेतल्या होत्या. सातत्याचा जनसंपर्क आणि कुशल रणनीती आखून त्यांनी इतर राजकीय पक्षांना ५० टक्क्यांच्या आत रोखत हे यश मिळविले आहे. गोंदिया जिल्ह्यात एकूण ३४८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्या. त्यांतील २४० ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. त्यांपैकी भाजप समर्थीत उमेदवारांनी ९९, त्यापाठोपाठ कॉंग्रेस ७०, अपक्ष २८, राष्ट्रवादी कॉंग्रेस २६, भाजप समर्थीत आमदार विनोद अग्रवाल यांच्या चाबीचे १४ आणि शिंदे गट (बाळासाहेबांची शिवसेना) यांनी ३ ग्रामपंचायतींवर विजय मिळविला आहे.

भंडारा जिल्ह्यात ३०५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यांपैकी १६६ निकाल हाती आलेले आहेत. येथे भाजप ३१, कॉंग्रेस २८, राष्ट्रवादी २६, शिवसेना २, शिंदे गट १३ आणि इतरांनी ६६ ग्रामपंचायती पटकावल्या आहेत. येथेही भाजप आघाडीवर दिसत आहे. तालुकानिहाय निकाल पुढीलप्रमाणे - लाखनी तालुक्यात ५१ पैकी २५ जागांवर भाजप, २० कॉंग्रेस, २ राष्ट्रवादी कॉंग्रेस, ३ अपक्ष आहेत. साकोली तालुक्यात २४ भाजप, १२ कॉंग्रेस, ७ राका, १ अपक्ष, लाखांदूर तालुक्यात ५० पैकी भाजप ३५, कॉंग्रेस १०, अपक्ष ५, तुमसर तालुक्यात ७७ पैकी भाजप ३५, बाकी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायती आहेत. भंडाऱ्यातही ५० टक्क्यांच्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर भाजपने विजय मिळविला आहे.

गोंदिया तालुक्यात ७१ पैकी ४० जागांचे निकाल आले. यामध्ये भाजप १४, भाजप समर्थीत चाबी १२, राष्ट्रवादी कॉंग्रेस ५ ठिकाणी विजयी झाले आहे. तिरोडा तालुक्यात ७४ पैकी २४ निकाल आले. यामध्ये भाजप १३, सडक अर्जुनीमध्ये ३८ पैकी २२ भाजप, अर्जुनीमध्ये २० पैकी १० भाजप, आमगावमध्ये ३४ पैकी १५ भाजप, सालेकसा २७ पैकी भाजप १५, तर देवरी तालुक्यामध्ये २० पैकी १२ ग्रामपंचायतींवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT