MLA Sudhir Mungantiwar

 

Sarkarnama

विदर्भ

आमदार मुनगंटीवार म्हणाले, जीव तोडून केलाय तुमच्या मागण्यांचा पाठपुरावा...

लोकांना अजाणचा आवाज आल्यानंतर उपस्थितांना उलगडा झाला की, आमदार मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) बोलता बोलता का थांबले.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : सध्या सर्वत्र नगरपंचायत निवडणुकांची धूम सुरू आहे. चंद्रपूर (Chandrapur) आणि गडचिरोली जिल्ह्यातही नेत्यांचे दौरे आणि सभांचा धुरळा उडत आहे. भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar) यांनी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. विकास कामे करताना जात, पात, धर्म, पंथ यांच्या पलीकडे जाऊन जनतेच्या मागण्याचा पाठपुरावा केला आणि प्रगतीचा वेग सुसाट वाढवला, असे आमदार मुनगंटीवार पोंभूर्णा येथे म्हणाले.

परवा परवा कोरपना येथे एका प्रचार सभेला संबोधित करीत असताना भाषण करता करता ते अचानक थांबले. का थांबले, क्षणभर कुणालाच काही कळले नाही. पण तेव्हा मशिदीत अजाण सुरू झाली होती. तो आदर म्हणून त्यांनी भाषण थांबविले. पण लोकांना अजाणचा आवाज आल्यानंतर उपस्थितांना उलगडा झाला की, आमदार मुनगंटीवार बोलता बोलता का थांबले. संपूर्ण अजाण होईपर्यंत ते तसेच थांबून राहिले. जसे राष्ट्रगीताच्या वेळी आपण कुठेही असलो तरी सावधान होऊन जातो. तसेच आमदार मुनगंटीवार अजाण होईपर्यंत थांबले. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाषण सुरू केले आणि सभा पूर्ववत सुरू झाली.

संवेदनशील नेत्याचा हा गुण उपस्थितांना फारच भावला. यावेळी मंचावर माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार ॲड. संजय धोटे, सुदर्शन निमकर, युवा स्वाभिमान पक्षाचे सुरज ठाकरे आणि नगराध्यक्ष एहतेशाम अली उपस्थित होते. पूर्व विदर्भात सध्या राज्यस्तरीय नेत्यांचे दौरे सातत्याने सुरू आहेत. प्रचार सभांना जोर आला आहे. आरोप-प्रत्यारोप होत आहेत. नागपूर विधान परिषद निवडणुकीत विदर्भात दणदणीत विजय मिळाल्यामुळे भाजप नेत्यांच्या उत्साह वाढलेला आहे. निवडणुकीच्या या रणधुमाळीत वातावरण दिवसागणिक तापत चालले आहे.

भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि राज्यातील नगरपंचायतींच्या निवडणुका २१ डिसेंबर आणि १८ जानेवारीला होऊ घातल्या आहेत. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे नेते प्रचाराला भिडले आहेत. पूर्व विदर्भातील तालुक्यातालुक्यांत आणि गावागावांत प्रचाराचा धुरळा उडत आहे. अशात कोरपना येथे झालेल्या त्या सभेची भरपूर चर्चा झाली. भाजपची सत्ता असलेल्या नगरपंचायतींमध्ये विकासकामांची दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यात आली आहेत. गावांची प्रगती सुसाट वेगाने होत आहे, त्या प्रगतीला ब्रेक लागायला नको, असे आवाहन आमदार मुनगंटीवार यांनी जनतेला केलेले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT