MlC Dr. Parinay Fuke Sarkarnama
विदर्भ

आमदार परिणय फुके संतापले; म्हणाले विद्यार्थ्यांच्या जिवाशी हा काय खेळ चालवलाय ?

उद्या त्यांच्या आरोग्याचे काही बरेवाईट झाल्यास जबाबदारी कुणाची, असा सवाल आमदार फुके (MLC Dr. Parinay Fuke) यांनी केला.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढावी, शाळाबाह्य विद्यार्थी राहू नये, यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या. शालेय पोषण आहार ही त्यातीलच एक योजना. पण मागील महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) काळात या योजनेचाही पार बट्ट्याबोळ झाल्याचा आरोप भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे विधानपरिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांनी केला आहे.

भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या (ZP) सर्व शाळांमध्ये (Schools) शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत अतिशय निकृष्ट दर्जाचे तांदूळ वाटप झाले आहेत. हे तांदूळ (Rice) इतके खराब आहेत की हातात घेतल्यावर बघून जरी ठेवले तरी ते अर्धे होतात. कारण त्या तांदुळाचे अर्धी पावडर होऊन जाते. अजिबात खाण्याच्या लायकीचे नसलेल्या या तांदुळाचा भात विद्यार्थी नाइलाजाने खात आहेत. उद्या त्यांच्या आरोग्याचे काही बरेवाईट झाल्यास जबाबदारी कुणाची, असा सवाल आमदार फुके (MLC Dr. Parinay Fuke) यांनी केला.

मागील महाविकास आघाडी सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला होता. त्यामुळेच त्यांचे मंत्री अजूनही जेलची हवा खात आहेत. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या विषयात तरी त्या लोकांनी भ्रष्टाचार करण्याचा मोह आवरायला हवा होता. पण तेथेही त्यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला. हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. काही पालकांनी हा प्रकार आमदार फुके यांच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर त्यांनी लगेच जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याशी याबाबतीत चर्चा केली आणि लाखांदूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील तांदूळ जप्त करून चांगल्या प्रतीचा तांदूळ त्वरित शाळांना उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.

आमदार फुके यांनी योग्य वेळी पाऊल उचलल्यामुळे आता विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचा पोषण आहार मिळणार आहे. पालक आणि नागरिकांनी अशाच पद्धतीने जागरूक राहून चुकीच्या गोष्टी घडत असल्यास त्या लोकप्रतिनिधींच्या लक्षात आणून द्याव्या. जेणेकरून तात्काळ उपाययोजना करून संभाव्य नुकसान टाळता येईल. शाळांना निकृष्ट तांदूळ पुरविल्याप्रकरणी जे कुणी दोषी असतील, त्यांची गय गेली जाणार नाही, असेही आमदार फुके यांनी म्हटले आहे. या व्यतिरिक्त इतर कुठेही असा प्रकार होत असल्यास तात्काळ त्यांची माहिती द्यावी, असे आवाहनही आमदार डॉ. परिणय फुके यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT