Amaravati News : अमरावतीतल्या विकासकामांवरून भाजप समर्थक आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि भाजपमध्यचे आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी आमदार राणा यांच्याविरोधात आंदोलन केले आहे. रवी राणा यांनी अमरावतीत अनेक ठिकाणी रस्त्य्याचे कामं प्रस्थापित केली, अशा आशयाचे फलक लावले, पण अद्यापही एकाही रस्त्याचं काम सुरू न झाल्यानं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं.
तसेच, भाजप (BJP) नगरसेवकांनी केलेल्या कामांच्या ठिकाणी, राणांचे फलक लावण्यात आले होते, असे भाजप पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. या फलकांवर काळं फासत, आमदार राणांचा निषेध भाजपकडून करण्यात आला आहे.
आमदार रवी राणांनी आमच्या नगरसेवंक पदाच्या कार्यकाळातील जो निधी मंजूर केला. त्या ठिकाणी राणांनी स्वत:चे फलक लावले. याचे श्रेय ते घेत होते. आम्ही त्यांना दहा दिवसांची मुदत दिली होती की, तुम्ही लावलेले बोर्ड काढा. तुमचा त्याच्याशी काही सबंध नाही. पण त्यांनी बोर्ड काढले नाही. स्वत:काम करायंच नाही, दुसऱ्याचं श्रेय घ्यायचं, हे भाजपचा कार्यकर्ता सहन करणार नाही. म्हणून आम्ही राणांच्या बोर्डाला काळं फासलं, असं अमरावतील स्थानिक भाजप पदाधिकाऱ्याने दिली आहे.
एकीकडे आमदार राणा हे राज्य सरकार आणि भाजपचे समर्थक आमदार आहेत. आता भाजपच्याच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राणांना विरोधात आघाडी उघडल्याने, अमरावतीच्या राजकीय वर्तुळात याची चर्चा घडून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.