Suhas Kande and Devendra Fadanvis
Suhas Kande and Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

Suhas kande : आमदार सुहास कांदे म्हणाले, गृहमंत्री गोलमोल उत्तर देत आहेत...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा नाशिक (Nasik) जिल्ह्यातील आमदार सुहास कांदे यांनी आज सभागृहात चांगलाच उचलून धरला. या मुद्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी त्यांच्या लक्षवेधीवर उत्तर दिले. पण आमदार कांदेंचे समाधान झाले नाही.

सभागृहात आमदार कांदे (MLA Suhas Kande) म्हणाले, हे प्रकरण न्यायालयात असताना न्यायाधीशांची बदली झाली. त्यामुळे हा निर्णय संदिग्ध आहे. मंत्र्यांनी भ्रष्टाचार केल्यानंतरही यामध्ये निवृत्त न्यायाधीशांचे मत मागवले गेले. पण त्याची गरज नव्हती. सरकारने अपिलात जायचे होते, ओपिनियन मागण्याची गरजच नव्हती. यावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारने हा निर्णय घेतला होता. त्यामुळे हा निर्णय बदलता येतो की नाही, हे आधी तपासून बघू. त्यावर थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेताना आपण मागील सरकारचा निर्णय बदलवला, मग हा निर्णय का बदलवू शकत नाही, असा प्रश्‍न आमदार कांदे यांनी केला.

यासंदर्भात बोलताना गृहमंत्री फडणवीस म्हणाले, लोकसेवक कंत्राटदार यांना सत्र न्यायालयाने दोषमुक्तीचा अर्ज मंजूर केला. विशेष सरकारी वकिलांनी प्रस्ताव पाठवला की आपण अपील केली पाहिजे. हा विषय समोर आल्यानंतर सरकारी अभियोक्त्यांनी अपिलाची आवश्यकता नाही, असे सांगितले. त्यानंतर हा विषय ज्युडीशरी विभागाकडे गेला. त्यांनी निर्णय दिला की अपील केले पाहिजे. त्यामुळेच ते दोन जीआर काढण्यात आले. अपिलामध्ये जायला सांगण्यात आले. हा विषय पुन्हा याचिकेकरिता सरकारी अभियोक्त्यांकडे गेला. त्यांनी काही कारणे देऊन हा विषय सरकारकडे परत पाठवला. ज्युडीशरीने पुन्हा अपील केली पाहिजे, असा निर्णय दिला.

या उत्तराने आमदार कांदेंचे समाधान झाले नाही. त्यामुळे भ्रष्टाचार झाला असेल तर कुणालाही पाठीशी घातले जाणार नाहीत. गरज पडल्यास देशाचे सॉलिसिटर जनरल यांचेही मत यामध्ये घेतले. त्यांनी जर असे म्हटले की अपिलात गेले पाहिजे, तर आपण नक्की पुन्हा न्यायालयात जाऊ. आमदार सुहास कायंदे यांच्या मताची मी गंभीर नोंद घेतली आहे, असे फडणवीसांनी सांगितल्यानंतर या लक्षवेधीवरील सुरू झालेला गदारोळ शांत झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT