Sandeep Deshpande Sarkarnama
विदर्भ

Sandeep Deshpande:...बाळासाहेबांनी राऊतांना शिष्य म्हणून स्वीकारलं नसतं; संदीप देशपांडेंचा राऊतांना चिमटा

सरकारनामा ब्यूरो

"नेते आणि गुरू म्हणून बाळासाहेबांच्या चरणी आम्ही कायम मस्तक ठेवले. असा गुरू होणे नाही. झाले बहू, होतील बहू, परंतु यासम हाच," अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वंदन केले आहे. त्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांची खिल्ली उठवली आहे.

कोणी कोणाला गुरू मानावं, यापेक्षा तो गुरू तुम्हाला शिष्य मानतो का हे महत्त्वाचे आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी संजय राऊत यांचे गुरुत्व स्वीकारले असते असे मला वाटत नाही, बाळासाहेबांनी राऊतांना शिष्य म्हणून स्वीकारलं नसतं. कुणाला शिष्य करायचं हे गुरुच ठरवतो. शेवटी गुरूलाही चॉईस असतात," असा टोला देशपांडे (sandeep deshpande) यांनी राऊतांना लगावला

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज अमरावतीत मनसेचा मेळावा होणार आहे. राज ठाकरे यांचे अमरावतीवर विशेष प्रेम आहे. अमरावती विधानसभा निवडणूक पुर्ण ताकदीने लढवू , असा विश्वास देशपांडे यांनी व्यक्त केला. राज ठाकरे पुढील आठवड्यात विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत, अशीही माहिती देशपांडे यांनी दिली.

खासदार नरेश म्हस्के यांनीही संजय राऊत यांच्यावर तोफ डागली. "राऊतांना आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. ते खरे शिवसैनिक नाही," अशी टीका म्हस्के यांनी केली.

संजय राऊत काय म्हणाले..

बाळासाहेबांनी महाराष्ट्र घडवला, लाखो निष्ठावंतांची फौज उभी केली. त्यांच्या मनात स्वाभिमानाची ज्योत फुलवली.निष्ठेची मशाल हाती दिली. ते आज आमच्यात नसले तरी आजही आम्ही ती मशाल पेटत ठेवलेली आहे, आणि पेटतच ठेऊ हीच आमची त्यांना गुरुदक्षिणा आणि गुरुवंदना आहे, असेही राऊत बाळासाहेबांना वंदन करत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT