Maharashtra Navavirman Sena Sararnama
विदर्भ

MNS Nagpur News : मनसेने नेमले आणखी दोन जिल्हाप्रमुख, जुना वादही मिटवला !

सरकारनामा ब्यूरो

MNS has expanded Nagpur District Executive : आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागपूर जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार केला आहे. तसेच एकच जिल्हाप्रमुख नेमण्याऐवजी तिघा जणांना प्रत्येकी दोन विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख करण्यात आले आहे. (Three people have been made heads of two assembly constituencies each)

मागील आठवड्यात मनसेचे नेते अविनाश जाधव, संदीप देशपांडे आणि राजू उंबरकर यांनी रविभवन येथे बैठक घेऊन कार्यकारिणीची घोषणा केली. आपसातील भांडणे आणि एकमेकांच्या मतदारसंघात घुसखोरी होऊ नये, याची काळजी कार्यकारिणी जाहीर करताना घेण्यात आली आहे. प्रत्येकाला जबाबदारी देताना मतदारसंघ आणि तालुक्यांचा ठळकपणे उल्लेख करण्यात आला आहे. सोबतच जिल्ह्याचा प्रमुख कोण हा वादही मनसेने मिटवला असल्याचे दिसून येते.

रामटेक व उमरेड विधानसभा मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्षपदी शेखर दुंडे तर जिल्हा संघटकपदी उमरेडचे सचिन नागपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सावनेर व कामठी विधानसभा मतदारसंघात जिल्हाध्यक्षपदी जयंत चव्हाण तर जिल्हा संघटक स्वप्निल चौधरी यांना नेमण्यात आले आहे.

काटोल व हिंगणा विधानसभा या दोन मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख म्हणून आदित्य दुरुगकर यांची यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या सोबतीला जिल्हा संघटक दिलीप गायकवाड, अनिल पारखी उपाध्यक्ष, रितेश कान्होलकर, अजय सिरसवार सचिव, दीपक ठाकरे, तालुका अध्यक्ष (नागपूर ग्रामीण), सचिन चिटकुले (हिंगणा), साहील ढोकणे (नरखेड), अनिल नेहारे अध्यक्ष (काटोल) यांना देण्यात आले आहे.

शेतकरी (Farmers) सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुरेश वांदिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे रामटेक, (Ramtek) उमरेड आणि कामठी हे तीन मतदारसंघ सोपवण्यात आले आहेत. यापूर्वी एकच जिल्हाप्रमुख आदित्य दुरूगकर होते. त्यांच्याकडे काटोल व हींगणा या दोन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी होती. कामात सुटसुटीतपणा यावा, यासाठी पुन्हा दोन जिल्हाप्रमुख नेमण्यात आले आहेत.

नाका तेथे शाखा..

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या संकल्पनेनुसार ‘नाका तिथे शाखा’ अंतर्गत प्रत्येक पदाधिकाऱ्याला शहर व तालुका पातळीवरील सर्व प्रमुख नाक्यांवर पक्षाचा झेंडा व फलक लावून जनतेसाठी रोज दोन तास देण्याचे निर्देश देण्यात आले. ‘गाव तिथे शाखा‘ संकल्पनेनुसार प्रत्येक गावात शाखा सुरू करून जनसमस्या सोडविण्याची जवाबदारी तालुका अध्यक्ष व शाखा अध्यक्षांवर देण्यात आली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT