Atul Vandile Sarkarnama
विदर्भ

मनसेला पुन्हा मोठा धक्का; प्रदेश उपाध्यक्षानेच बांधले घड्याळ!

मनसेचे (MNS) प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिलेंनी (Atul Vandile) मनसेला जय महाराष्ट्र करत आज राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विदर्भात (Vidarbha) मोठा झटका बसला आहे. मनसेचे (MNS) प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले (Atul Vandile) यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत आज (ता.13 जानेवारी) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे विदर्भात मनसेला मोठे खिंडार पडले आहे. वांदिलेंसह त्यांच्या सोबत सुमारे चाळीस पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला आहे. वांदिलेंच्या रुपाने मनसेचा विदर्भातील ओबीसी चेहरा होता. मात्र, त्यांच्या पक्षांतराने पक्षाची विदर्भातील ताकद कमी झाली आहे. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार याबाबत त्यांनी आधीच जाहीर केले होते.

वांदिले म्हणाले, मनसे विदर्भात वाढला नाही ही खंत आहे. आमची नाराजी राज ठाकरे यांच्यावर नाही. तर, दुसऱ्या फळीतील नेत्यावर आहे. दुसऱ्या फळीतील नेत्यांनी कधीच आमच्याकडे दौरे केले नाहीत. पक्षाचा कोणताही कार्यक्रम दिला जात नव्हता. मग अशा ठिकाणी थांबून काय उपयोग नाही, अशी कार्यकर्त्याची भावना होती. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वांदिले यांच्यासह सुमारे 40 कार्यकर्ते हे मुंबईत पक्षप्रवेशासाठी आले होते. कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरूनच राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

वांदिले हे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष होते. याबरोबरच ते तैलिक महासंघाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष व ओबीसी चेहरा म्हणून त्यांची विदर्भात चांगली ओळख आहे. ते हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार होते. त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली होती. मागील अनेक वर्षांपासून पक्षात काम करताना संघटना वाढीसाठी प्रयत्न केले. वंदिलेंच्या रूपाने मनसेला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसापुर्वी पुण्यातील मनसेनेत्या रूपाली ठोंबरे यांच्या रूपाने पक्षाला धक्का बसला होता. त्यांनीही राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले आहे. आता वादिंलेच्या रुपाने मनसेला विदर्भात मोठा धक्का बसला आहे. वंदिले यांच्या प्रवेशामुळे मात्र राष्ट्रवादीची विदर्भात ताकद वाढणार, असे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT