MNS Sarkarnama
विदर्भ

MNS : नागपूर शहरात मनसे नियुक्त करणार १५६ शाखाध्यक्ष

पक्षाची बांधणी करण्यावर या बैठकीत चर्चा झाली. सद्यःस्थितीत नागपूर (Nagpur) महानगरपालिकेमध्ये (Municipal Corporation) मनसे (MNS) कुठेही नाही.

Atul Mehere

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भात येऊन गेले आणि तमाम कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी जान फुंकली. नागपूर महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मनसे शहराच्या १५६ वार्डांमध्ये शाखा तयार करणार आहे. लवकरच शाखाध्यक्षांची नियुक्ती केली जाणार आहे.

यासंदर्भात मनसेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आणि पक्षाची बांधणी करण्यावर या बैठकीत चर्चा झाली. सद्यःस्थितीत नागपूर (Nagpur) महानगरपालिकेमध्ये (Municipal Corporation) मनसे (MNS) कुठेही नाही. त्यामुळे शहरात पक्षाचे नेटवर्क तयार करण्यावर मनसेचे पदाधिकारी भर देणार आहेत. संघटना बांधणीवर लक्ष केंद्रित करण्याचे राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे आदेश आहेत. त्यानुसार कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

या बैठकीसंदर्भात सांगताना मनसेचे नागपूर शहराध्यक्ष विशाल बडगे म्हणाले, सद्यःस्थितीत जवळपास ७० ते ७५ वार्डांमध्ये मनसेच्या शाखा आहेत. आत्ता कुठे आम्ही अर्ध्यावर आहोत. पुढील काळात १५६ वार्डांमध्ये शाखाध्यक्ष नियुक्त करून संघटन बळकट करायचे आहे. राज ठाकरे यांनी जुनी कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर आता शहरासाठी दोन अध्यक्ष देण्यात आले आहेत. अध्यक्षापासून ते खाली शाखाध्यक्षांपर्यंतची बांधणी आगामी काळात करायची आहे.

गेल्या काही वर्षांपासून झोपलेली मनसे आत्ता कुठे जागी झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी एक दौरा करून कार्यकर्त्यांमध्ये जान फुंकली आहे. नागपूरसह पूर्व आणि पश्‍चिम विदर्भातील कार्यकर्त्यांना आता संघटना बांधणीवर जोर दिला आहे. ठाकरेंच्या दौऱ्याने मनसेमध्ये उत्साह संचारला आहे. हा उत्साह निवडणुकांपर्यंत कायम राहिल्यास नागपूर महानगरपालिकेमध्ये यावेळी मनसे खाते उघडू शकते.

देशपांडे, जाधव पुढील आठवड्यात येणार..

महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने संघटन बांधणीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव पुढील आठवड्यात नागपूरला येणार आहेत. तेव्हा दोन-तीन आठवड्यांतील कामाचा अहवाल आणि पुढील काळात करायच्या कामांचे नियोजन आम्ही त्यांच्यासमोर ठेवणार आहो. विभागावर संघटन बांधणीच्या कामाचा आढावा घेतील आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT