Narendra Modi and Eknath Shinde Sarkarnama
विदर्भ

New Delhi News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवारासह थोड्याच वेळात पंतप्रधानांना भेटणार...

Delhi : कुठलीही राजकीय चर्चा होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

सरकारनामा ब्यूरो

This visit is going to be completely family : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (ता. २२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहे. ही भेट पूर्णतः कौटुंबिक असणार आहे. यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. (The Shinde family has arrived in Delhi at 7.30 am today)

सकाळी ११.३० वाजता पंतप्रधान निवासस्थानी ही भेट होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि सून सोबत नातू देखील पंतप्रधान यांना भेटणार आहेत. या भेटीसाठी शिंदे कुटुंबीय आज सकाळी ७.३० वाजता दिल्लीत दाखल झालेले आहेत.

मुख्यमंत्री शिंदे अचानक पंतप्रधानांच्या भेटीला आले असल्याने उलट सुलट चर्चांना पेव फुटले होते. पण त्यांची ही भेट नियोजित असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री शिंदे एनडीएच्या बैठकीला आले असताना त्याच दिवशी त्यांना भेटीसाठी आजची वेळ देण्यात आली होती. त्यानुसार ते आज सकाळीच सहकुटुंब दिल्लीत दाखल झाले.

शिंदे सहपरिवार दिल्लीत पंतप्रधानांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चा होणार नाही, असे सांगण्यात येत असले तरी. महाराष्ट्रातील काही मुद्द्यांवर या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. खासकरून सोयाबीन, एमएसपी या विषयांवर मुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.

याशिवाय महाराष्ट्रातील (Maharashtra) पावसाच्या स्थितीवरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधानांची भेट झाल्यानंतर शिंदे सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत दिल्लीत असणार आहेत. या वेळेत ते भाजपच्या (BJP) काही नेत्यांचीही भेट घेण्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांचा हा दौरा कौटुंबिक असला तरी यामध्ये काही राजकीय भेटी होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT