PM Narendra Modi, Umashankar Guddu Agrawal
PM Narendra Modi, Umashankar Guddu Agrawal Sarkarnama
विदर्भ

Modi : मोदींनी गरिबांची ‘ती’ योजना बंद करू नये, प्रदेश कॉंग्रेस रेशनिंग कमिटीची मागणी...

Atul Mehere

नागपूर : पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत देशातील ८० हजार कोटी लोकांना ५ किलो धान्य मोफत दिले जात होते. कोरोना काळात केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती. ३० सप्टेंबरला या योजनेची मुदत संपणार आहे आणि ८० कोटी लोकांना धान्य मिळणार नाही. त्यांच्यावर पुन्हा उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे या योजनेला पुन्हा एक वर्ष मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस रेशनिंग कमिटीचे प्रदेशाध्यक्ष उमाशंकर ऊर्फ गुड्डू अग्रवाल यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना गुड्डू अग्रवाल म्हणाले, केंद्र सरकारने (Central Government) सुरू केलेली ही योजना खरोखर चांगली आहे. पण आताच्या घडीला ही योजना बंद करणे योग्य होणार नाही. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी त्या काळात ज्यांचे रोजगार गेले, व्यवसाय बंड पडले होते, त्यातून लोक पूर्णपणे सावरलेले नाहीत. गरीब लोकांना त्या परिस्थितीतून सावरायला अजून काही काळ लागणार आहे. त्यामुळे पंतप्रधान (Prime Minister) गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ देण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गरीब जनतेचा विचार करून या योजनेला आणखी एक वर्ष वाढ दिली पाहिजे.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेमध्ये ८० हजार कोटी जनतेला ५ किलो धान्य मोफत दिले जात होते. योजनेच कालावधी सप्टेंबरपर्यंतच होता. ही योजना पुढे सुरू ठेवण्याबाबत सरकारकडून अद्याप कोणताही आदेश आलेला नाही. कोरोना काळात मार बसलेली जनता अद्याप सावरलेली नाही आणि महागाई भरमसाठ वाढलेली आहे. अशा परिस्थितीत मोफत मिळणारे धान्य बंद झाले, तर लोकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. या योजनेला एक वर्षाची मुदत वाढ दिल्यास गरीब जनतेला फायदा होईल.

६९००० च्या वरचे जे एपीएल (केशरी कार्ड) रेशन कार्ड धारक आहेत, त्यांना ८ रुपये प्रति किलो गहू आणि १० रुपये प्रति किलो तांदूळ दिला जायचा. पण गेल्या पाच वर्षांपासून ही योजना बंद करण्यात आली आहे. ही योजनासुद्धा आता सुरू करण्याची गरज आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास १५ ते १६ हजार कोटी लोकांना या योजनाचा लाभ पूर्वी मिळत होता. आता हे लोक धान्यापासून वंचित आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी उमाशंकर ऊर्फ गुड्डू अग्रवाल यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT