Nilam Gorhe and Manisha Kayande Sarkarnama
विदर्भ

Monsoon Session 2023 Live: नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे आणि विप्लव बाजोरियांना अपात्रतेची नोटीस !

Disqualification Notice To MLA: विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे नोटीस देण्यात आली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Monsoon Session of Maharashtra Assembly 2023 : विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, सदस्य मनीषा कायंदे आणि बिपल्व बाजोरिया यांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे. या तिघांनीही उद्धव ठाकरे गटातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ही नोटीस देण्यात आली आहे. विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे नोटीस देण्यात आली आहे. (A notice has been given to Jitendra Bhole)

शिवसेना उद्धव ठाकरे गटाने अपात्रतेसाठी नोटीस बजावली आहे. विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे ही नोटीस देण्यात आली आहे. कामकाज सुरू झाल्यावर महाराष्ट्र गीत होताच जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर निलम गोऱ्हे यांनी गटनेत्यांच्या बैठकीला उपस्थित असता, तर तुमचे म्हणणे येथे लगेच ग्राह्य धरले असते. तुम्हाला माझ्यावरदेखील अविश्‍वास आणायचा असेल, तर तुम्ही आणू शकता’, असे जयंत पाटील यांना सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस मंत्र्यांचा परिचय करून द्यायला उभे झाले असता, त्यालाही विरोध करण्यात आला. जयंत पाटलांचे ऐकून घेतले आहे. आता त्यांचेही ऐकू द्या, असे निलम गोऱ्हेनी सांगितले. सभापतींवर असा केव्हाही आक्षेप घेता येणार नाही. त्याचे काही नियम आहेत. शोक प्रस्ताव महत्वाचा आहे. सभागृहाला अशा प्रकारे वेठीस धरता येणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मंत्र्यांचा परिचय करून दिल्याशिवाय परिषदेचे कामकाज सुरू होऊच शकत नाही, असे म्हणत फडणवीसांनी परिचयाला सुरुवात केली. अजित अनंतराव पवार - उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन, छगन भुजबळ - अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, दिलिप वळसे पाटील सहकारी मंत्री.

हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण मंत्री विशेष सहाय्य, धनंजय मुंडे - कृषिमंत्री, धर्मरावबाबा आत्राम - अन्न व औषध प्रशासन मंत्री, संजय बमसोडे- क्रीडा युवक कल्याण व बंदरे मंत्री, अदिती तटकरे - महिला व बालविकास मंत्री, अनिल पाटील मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री.

परिचय झाल्यानंतर पुन्हा जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आक्षेप घेतला. त्यावर असा केव्हाही उठून आक्षेप घेता येणार नाही, त्याचेही काही नियम आहे. त्यामुळे नियमबाह्य कामकाज आपल्याला चालवता येणार नाही, असे फडणवीसांनी (Devendra Fadanvis) म्हणताच सभागृहात गदारोळ सुरू झाला. नंतर निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) बोलत असतानाही गदारोळ सुरूच होता. त्यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT