Jayant Patil Sarkarnama
विदर्भ

Monsoon Session 2023 : ...तर 'त्यांनाही' ‘कोर्टात’ खेचणार, जयंत पाटील का खवळले ?

सरकारनामा ब्यूरो

Monsoon Session of Maharashtra Assembly 2023 : जी इमारत आधीच तयार आहे आणि माझ्याच आमदार निधीतून झालेली आहे. त्याच इमारतीचे ‘इस्टिमेट’ पुन्हा बनवता आणि खोटी बिले काढता. हा काय प्रकार आहे, असे म्हणत आमदार जयंत पाटील चांगलेच खवळले. या प्रकरणी मी न्यायालयात जाणार आणि गरज पडली तर गुलाबराव पाटलांनाही या प्रकरणात न्यायालयात घेणार, असे आमदार पाटील म्हणाले. (Gulabrao Patal will also be taken to court in this case)

पुरवणी मागण्यांवर बोलताना आज (ता. २६) आमदार पाटील म्हणाले, अलीबाग जिल्ह्यात मंदिरातून ४० किलो चांदीची मूर्ती चोरून नेली. अजूनही तपास लागला नाही. आशिष देशमुख यांनी तक्रार केली. पण चोरांचा तपास लागला नाही. मूर्ती चोरीचा व्यवसाय वाढतो आहे. त्याची दक्षता घेतली जात नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोर दिसत असूनही त्याला पोलिसांनी पकडले नाही.

भंडारी समाजाचे एक समाजभवन माझ्या आमदार निधीतून बांधले. अद्ययावत सभागृह आहे. जी इमारत तयार आहे. माझ्या निधीतून तयार झाली. त्याला तीन-चार वर्ष झाली. पण आता कुणीही मागणी केलेली नसताना त्याचे काम दाखवले जात आहे. अध्यक्ष शरद खोत आहेत. खोत सार्वजनिक बांधकाम विभागातले निवृत्त अधिकारी आहेत. त्यांना ही सगळी माहिती आहे. जी इमारत तयार आहे, त्याचे इस्टिमेट बनवता, हे काय चाललंय, असा संतप्त सवाल आमदार पाटील यांनी केला.

इस्टिमेट ज्याने बनवले, त्याची चौकशी झाली पाहिजे. कारण अशी खोटी बिले काढण्याचा सपाटा सुरू आहे. इमारत असेल किंवा नसेल. पण असे काम करणाऱ्या त्या अधिकाऱ्याला जबाबदार धरले पाहिजे. हे खोटं असेल, तर मी माघार घेईन. पण हा प्रकार बोकाळता कामा नये. सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासक आहे. अधिकाऱ्यांचेच राज्य आहे. ४०-४०, ५०-५० लाखांची बिले टाकली जात आहेत आणि या प्रकरणात तर संस्थेचे अध्यक्ष स्वतः म्हणतात आम्ही मागणी केलेली नाही. मग शिफारस कुणी केली, तेही तपासावे. ज्यांची शिफारस असेल त्यांना न्यायालयात खेचणार, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला.

रायगड (Raighadh) जिल्ह्यात गावोगावी तलाव बांधणे. मागेल त्याला तलाव, अशी घोषणा कृषिमंत्र्यांनी (Dhananjay Munde) केली. पण किती जागेत तलाव देणार, याचा खुलासा केला नाही, तो कृषिमंत्र्यांनी करावा. हिंदुस्थान पेट्रोकेमिकलचा एक प्लांट अलिबागमधून पनवेल तालुक्यात जातो आहे. स्थानिक शासनाला ८० टक्के काम मिळाले पाहिजे.

वाशी आणि हमलापूर विभागात गॅस लाइन जाते आहे. आमचा जिल्हा गॅस लाइनने वेढला आहे. जेथून गॅस लाइन जाते, त्याच्या दोन्ही बाजूंना २० फूट काम करता येत नाही. यावरही सरकारने (Government) उपाययोजना करण्याची गरज आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT