Nagpur Assembly Winter Session News : अडीच महिन्यांचे बाळ असताना नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू झाले. नागपुरातील (Nagpur) कडाक्याच्या थंडीत तान्हुल्याला घेऊन जाणे तसे जिकरीचेच, पण महिला आमदार डगमगल्या नाहीत, तर तान्हुला आणि पतीसह नागपूर गाठले अन् अधिवेशनाला (Assembly Winter Session) हजेरी लावली.
या महिला आमदार आहेत नाशिकच्या (Nasik) सरोज अहिरे-वाघ. त्यांच्या तान्हुल्याचे नाव आहे प्रशंसक. महिला आमदारांच्या लहान मुलांसाठी बाल संगोपन केंद्र विधानभवन परिसरात सुरू करण्यात आले आहे. तेथे लहान मुलांची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. पण आमदार अहिरेंचा प्रशंसक खुपच लहान असल्याने त्यांचे पती प्रवीण वाघ हे प्रशंसकला सांभाळत आहेत. चिमुकल्या बाळाला पतीच्या स्वाधीन करून आमदार अहिरे बरोबर ११ च्या ठोक्याला विधानसभेत पोहोचल्या. यासाठी सकाळपासून वेळेचे काटेकोर नियोजन त्यांना करावे लागले.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे-वाघ या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन विधान भवनात पोहोचल्यानंतर मी आई आहेच सोबत आमदारही आहे, त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्वाची आहेत. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, सोबत मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्वाचे आहेत, त्यामुळे बाळाला घेऊन यावे लागले, अशी भावना अहिरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
सध्या प्रशंसकला त्याचे बाबा प्रवीण वाघ सांभाळत आहेत. ३० सप्टेंबरला त्याचा जन्म झाला. त्यानंतर प्रथमच अधिवेशन असल्याने त्या बाळ व पती प्रवीण वाघ आणि अन्य कुटुंबीयांसह विधानभवनात पोहोचल्या. कुटुंबीय बाळाला सांभाळतील, त्याचवेळी मी सभागृहात मतदारसंघातील प्रश्न मांडणार आहे. अधिवेशन किती दिवस चालेल माहिती नाही, लोकांचे अधिकाधिक प्रश्न सोडवण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.