MP Balu Dhanorkar and MLA Pratibha Dhanorkar
MP Balu Dhanorkar and MLA Pratibha Dhanorkar Sarkarnama
विदर्भ

खासदार धानोरकर म्हणाले, मोदी सरकार तरुणांना अग्नीवीर नाही संकटवीर बनविणार!

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : भारतीय सैन्य दलातील भरती प्रक्रियेत बदल करून केंद्रातील भाजप सरकारने तरुणांचे भवितव्य धोक्यात आणले आहे, असे म्हणत कॉंग्रेसचे चंद्रपूरचे (Chandrapur) खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांनी 'अग्निपथ' योजनेवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात आज काँग्रेसतर्फे (Congress) डॉ. आंबेडकर चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी पुढे बोलताना खासदार धानोरकर म्हणाले, देशात वाढत्या बेरोजगारीमुळे तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. आता तरुणांच्या देशसेवेच्या व्रताला काळिमा फासण्याचे काम आणि त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. चार वर्षांत देशातील तरुणांना हे सरकार अग्नीवीर नाही, तर संकटवीर बनविणार असल्याची जहरी टीका खासदार धानोरकर यांनी यावेळी केली.

आज वरोरा येथे खासदार बाळू धानोरकर व वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर (MLA Pratibha Dhanorkar) यांच्या नेतृत्वात झालेल्या धरणे आंदोलनात माजी आमदार अविनाश वारजूरकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, काँग्रेस नेते विनोद अहिरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू चिकटे, सुनंदा जिवतोडे, छोटु शेख, मनोहर स्वामी, राजू महाजन, प्रदीप बुराण, माजी सभापती रवींद्र धोपटे, प्रमोद मगरे, बाळू चिंचोलकर, अनील झोटींग, शुभम चिमुरकर, रत्ना अहिरकर, यशोदा खामनकर, ईस्तेखां पठाण, रामदास सुर, निखिल राऊत, सुयोग धानोरकर, राहील पटेल, प्रमोद नागोसे, विजय पुरी, तन्नू शेख, रियाज अनवर, सलीम पटेल, सुभाष दांदले, नगरसेविका प्रतिभा निमकर, धम्मकण्या भालेराव, आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

आंबेडकर चौकातून काँग्रेसचे पदाधिकारी घोषणा देत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले. आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांना निवेदन देण्यात आले. अग्नीपथ योजनेवरून सध्या देश धगधगत आहे. तरुणांमध्ये संतापाची लाट आहे. याचा उद्रेक व्हायच्या आधी केंद्र सरकारने जागे व्हावे, अन्यथा होणाऱ्या परिणामांची जबाबदारी घेण्यास तयार रहावे, असे आमदार प्रतिभा धानोरकर यावेळी म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT