Sanjay Jadhav, Prataprao Jadhav
Sanjay Jadhav, Prataprao Jadhav sarkarnama
विदर्भ

शिंदेंसोबत गेले कुटुंबच फुटले; खासदार प्रतापराव जाधवांना मोठा धक्का : भावानेच साथ सोडली

सरकारनामा ब्यूरो

मेहकर : बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव (Sanjay Jadhav) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात प्रवेश केला आहे. यामुळे मात्र, जाधव यांचे धाकटे भाऊ व मेहकरचे माजी नगराध्यक्ष व गट नेता संजय जाधव यांनी आपल्या खासदार भावाची साथ सोडली आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.

संजय जाधव हे अजूनही मूळ शिवसेनेतच (Shivsena) असल्याने आता जिल्ह्यात चर्चाना उधाण आले आहे. संजय जाधव हे प्रतापरावांचे सख्खे धाकटे बंधू असून ते उद्धव ठाकरेंच्याच (Uddhav Thackeray) शिवसेनेत असल्याचे त्यांनी सांगितले. आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वर्तमानपत्रातून दिलेल्या जाहिरातीत सुद्धा त्यांनी पक्ष प्रमुख असा उल्लेख केला असून जिल्ह्यातील शिवसेनाच्या इतर नेत्यांसोबत त्यांचे जाहिरातीत फोटो आहेत.

मेहेकरमध्ये मोठ्या प्रमाणात बॅनर लावले आहेत. बाळासाहेब ठाकरे माझे दैवत असून उद्धव साहेब हे माझे नेते असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जाधव यांना घरातूनच आव्हान मिळाले आहे. दरम्यान, खासदार जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या मुंबईतील बैठकीला हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता.

त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची जिल्हा संपर्क प्रमुख पदावरुन हकालपट्टी केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना पुन्हा जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. मात्र, आता घरातून झालेल्या विरोधामुळे त्यांच्या समोर मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT