Sudhir Mungantiwar Sarkarnama
विदर्भ

Sudhir Mungantiwar Angry: कुणाच्या ‘मायच्या लाल’ची ताकद नाही, असं म्हणत कुणावर भडकले मुनगंटीवार ?

Rahul Gandhi : त्यांना भारत कधी समजलाच नाही.

सरकारनामा ब्यूरो

Chandrapur Politics News : भारत मातेचा मृत्यू झाला, भारत मातेची हत्या झाली, असे खालच्या दर्जाचे वक्तव्य राहुल गांधी करतात. कुणाच्या ‘मायच्या लाल’ची ताकद नाही, असं करण्याची. भारतमातेच्या सुपुत्रांनी इंग्रजांना कापलं, याच भूमीत अफजलखानाला गाडलं, याच भूमीत औरंगजेबाला गाडलं. अन् राहुल गांधी सांगतात की, भारत मातेचा मृत्यू झाला. याच कारण एकच आहे आणि ते म्हणजे त्यांना भारत कधी समजलाच नाही, असे राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. (They have never understood India)

नुकतेच चंद्रपूरमध्ये एका कार्यक्रमात मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यांचा आणि त्यांच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, अदानी कोणाच्या राज्यात मोठा झाला, हेसुद्धा राहुल गांधींना माहिती नसावे. चिमणभाई पटेल जेव्हा कॉंग्रेसचे मुख्यमंत्री होते, तेव्हा चिमणभाई पटेल यांनी १९९३मध्ये १० पैसे प्रतिमीटरने कच्छची जागा दिली.

छबीलदास मेहता कॉंग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते, मुंद्रा पोर्टचे टेंडर छबीलदास मेहता यांनी दिलं आणि राहुल गांधींना हे लक्षात राहात नाही. त्यांना विस्मरण झाले आहे. हे राजकीय विस्मरणच त्यांना घातक ठरत आहे. म्हणून शरद पवारांनीही सांगितलं की, अदानीची चौकशी करण्याची गरज नाही आणि अदानी यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत तब्बल दोन तास चर्चाही केली, असे ते म्हणाले.

राहुल गांधींना (Rahul Gandhi) देशातील प्रश्‍न दिसत नाही, तर चोवीस तास केवळ मोदी आणि मोदीच दिसतात. मोदींवर खोटे आरोप करून त्यांच्या सत्तांध स्वभावाप्रमाणे खोट्या आरोपांच्या शिडीवर सत्ता प्राप्तीचे त्यांचे लक्ष्य आहे. म्हणून ते चीनमध्ये जाऊन तेथील लोकांना गुप्तपणे भेटतात,

कधी अमेरिकेमध्ये जाऊन भारताच्या (India) विरोधात वक्तव्ये करतात. आपल्याच देशाची निंदा करतात आणि असा व्यक्ती देशात सत्ता मिळवण्याचे स्वप्नं बघत आहे. या देशाची जनता अशा लोकांच्या हाती सत्ता देणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असेही सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT