Manohar Joshi, Gopinath Munde and Sudhir Mungantiwar.
Manohar Joshi, Gopinath Munde and Sudhir Mungantiwar. Sarkarnama
विदर्भ

Sudhir Mungantiwar News: मुनगंटीवारांनी करवून दिली जोशी, मुंडे आणि नवलकरांच्या ‘त्या’ निर्णयाची आठवण !

सरकारनामा ब्यूरो

Sudhir Mungantiwar in Budget Session 2023 : अ दर्जाच्या चित्रपटांना ४० लाख ब दर्जाच्या चित्रपटांना ३० लाख रुपये अनुदान सध्या दिले जाते. पण हे अनुदान निर्मात्यांना मिळण्यासाठी १ वर्षाचा कालावधी लागतो, असा प्रश्‍न आमदार पोतनीस यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता. त्यावर आता निधी ३ महिन्यांच्या आत अनुदान दिले जाईल, अशी घोषणा वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सभागृहात केली.

यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, पोतनीसांनी प्रश्‍न महत्वाचा मांडला, पण माहिती अपुरी सांगितली. ५ कोटी अनुदान रक्कम ठरलेली नाही. कुठल्याही मर्यादेमध्ये अनुदान दिला पाहिजे, असा निर्णय नसल्याने ५-१० कोटींचा प्रश्‍न येत नाही. अनुदान देण्यासाठी कालावधी जास्त लागत नाही. आता तर आम्ही तीन महिन्यांच्या आतच ते देणार आहोत. याची नोंद केवळ सभागृहानेच नव्हे, तर जनतेनेसुद्धा घेतली पाहिजे.

आतापर्यंत चित्रपट परीक्षणासाठी पाहिजे तशी व्यवस्था नव्हती. मागे वळून बघितले असता २०२१ मध्ये परीक्षण एकाही चित्रपटाचे परीक्षण करण्यात आले नाही. २०२०मध्येही तीच स्थिती होती. तत्कालीन सरकारने दारूची दुकाने सुरू केली. पण नवीन चित्रपटगृह करणे त्यांना जमले नाही, असे म्हणत मुनगंटीवारांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. आता अनुदान ३ महिन्यांच्या आत दिलंच पाहिजे, अशी नियमाची चौकट करतो आहे.

चित्रपट परीक्षणासाठी कालमर्यादा नव्हती, ती आता निर्धारित करण्यात आली आहे. २ वर्षाच्या आतील चित्रपटांनी अर्ज केला पाहिजे. मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि प्रमोद नवलकर यांनी २७ नोव्हेंबर ९७ला उत्तम पद्धतीने मराठी चित्रपटाच्या संवर्धनासाठी निर्णय घेतला होता. तेव्हापासून अनुदानात वाढ करण्यात आली. त्यानंतर २०१३ मध्येही वाढ केली गेली. आता या अनुदानातही बदल प्रस्तावित केले असल्याची माहिती मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सभागृहाला दिली.

प्रेरणादायी चित्रपटांना १ कोटी..

शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्यभीषेकाचे ३५०वे वर्ष आपण साजरे करीत आहो. महाराजांसोबत ज्यांनी जिवाची बाजी लावली, त्यांच्या प्रेरणादायी चित्रपटांना १ कोटी किंवा त्यापेक्षाही जास्त अनुदान देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तालुकास्तरावर सिनेमागृह तयार करण्यासंदर्भात विचार सुरू असून ओटीटी आणि इतर मंच विकसीत करतो आहे. त्यासाठी समिती नेमली आणि नाटमंदिरांना नाट्यचित्रमंदिरामध्ये रूपांतरित करू शकतो का, यावर विचार सुरू आहे, असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT