Sudhir Mungantiwar Sarkarnama
विदर्भ

Mungantiwar News : भारत-पाक सीमेवर छत्रपतींचा पुतळा; मुनगंटीवार म्हणाले शासन मदत करणार !

Statue of Chhatrapati Shivaji Maharaj at India-Pakistan Border : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागत केले.

Atul Mehere

Naghpur Political News : भारत-पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात श्रीनगर येथील कुपवाडा जिल्ह्यात छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेने हा पुतळा उभारण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्र सरकार या प्रकल्पासाठी त्यांना मदत करणार असल्याची माहिती राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. (A warm welcome at the Dr. Babasaheb Ambedkar International Airport)

अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराजांची वापरलेली वाघनखं भारतात आणण्यासाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर मुनगंटीवार आज (ता. १३) सकाळी उपराजधानी नागपुरात परतले. त्यावेळी नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांतील भाजप कार्यकर्ते व शिवभक्तांनी त्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागत केले.

जमलेल्या चाहत्यांनी या वेळी मुनगंटीवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, पेशवेकालीन टोपी, शाल-श्रीफळ आदी वस्तू भेट देत त्यांचा सत्कार केला. आनंदी कार्यकर्त्यांनी व शिवभक्तांनी मुनगंटीवार व एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला. मुनगंटीवार म्हणाले, की भारत-पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी झाल्यानंतर पाकिस्तानला हा पुतळा पाहूनच धडकी भरेल.

याच पद्धतीने लंडनमध्येही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. ब्रिटनच्या संसदेत भारतीय वंशाचे १६ खासदार आहेत. त्यांनी ब्रिटन सरकारकडून पुतळ्यासाठी जमीन देण्याचा प्रस्ताव दिला आहे. या जमिनीवर महाराष्ट्र शासन एनजीओंच्या मदतीने पुतळा उभारेल, असे ते म्हणाले.

नाना पटोले महाराष्ट्रातील पप्पू...

वाघनखांच्या बाबतीत काँग्रेसकडून टीका केली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले हेदेखील महाराष्ट्रातील एक पप्पूच आहेत, असा टोला लगावत मुनगंटीवार यांनी पटोले यांनी आपली वक्तव्यं तपासावी, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. वाघनखांच्या बाबतीत अवमान करणारी वक्तव्यं पप्पूचीच पार्टी करू शकते, अशी टीकाही त्यांनी केली.

टोलचा वाद राज्याचा नाही...

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी टोल नाक्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. मुनगंटीवार म्हणाले की, सरकारने आश्वासनांची पूर्तता केली आहे. हलक्या वाहनांना टोल वसुलीतून आधीच सूट देण्यात आली आहे. सध्याचा जो टोलवसुलीचा मुद्दा आहे, तो मुळात राज्याचा नाही. पहिल्यांदा ही भूमिका समजून घेतली तर अनेक प्रश्न सोपे होतील. अर्थात यासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. त्यावर दोन्ही बाजूंनी यशस्वी तोडगा निघेल, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT