Sudhir Mungantiwar and Parinay Fuke.
Sudhir Mungantiwar and Parinay Fuke. Sarkarnama
विदर्भ

Parinay Fuke : गोसेखुर्द आणि कऱ्हांडला अभयारण्याच्या दुहेरी कोंडीतून अशी सुटली तीन गावे !

सरकारनामा ब्यूरो

Bhandara Dr. Parinay Fuke News : भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्प आणि उमरेड - पवनी - कऱ्हांडला या वन्यजीव अभयारण्याला लागून असलेली तीन गावे. दुहेरी कोंडीत सापडली होती. राज्याचे माजी वन राज्यमंत्री डॉ. परिणय फुके आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याके पाठपुरावा करून तिन्ही गावांची कोडीतून सुटका केली. (was in a double dilemma)

भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील अंतर्गत उमरेड-पवनी-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्याला लागूनच मौजा पाहुणगाव, कवडशी, गायडोंगरी ही गावे आहेत. या गावांतील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गावाच्या एका बाजूला जंगल आणि दुसऱ्या बाजूला मारू नदी आहे. मारू नदीमुळे हे गाव जलमय झाले आहे. नदीच्या धरणाच्या पाण्यामुळे येथील ७० टक्के जमीन ओली राहते.

एका बाजूला गोसेखुर्द प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र आणि दुसरीकडे वन्यजीव अभयारण्य, यामुळे हे गाव दुहेरी कोंडीत सापडले असून, दुर्दशेचे अश्रू ढाळत आहे. याप्रकरणी गावकऱ्यांनी भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांची भेट घेऊन पाहुणगाव, कवडशी, गायडोंगरी या गावांचा वन्यजीव अभयारण्यात समावेश करून योग्य मोबदला व गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी केली होती.

ही बाब गांभीर्याने घेत डॉ.परिणय फुके (Dr. Parinay Fuke) यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांना भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील या गावांच्या दुर्दशेविषयी व झालेल्या अन्यायाची माहिती दिली. या गावांचा समावेश वन्यजीव अभयारण्यातील गावात करुन त्यांना योग्य ती नुकसान भरपाई आणि गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी केली.

हे गाव एकीकडे वन्यजीव अभयारण्य आणि दुसरीकडे गोसेखुर्द प्रकल्प अशा दुहेरी कोंडीत सापडले आहे. ७० टक्के जमीन ओली असताना गाव पाण्याखाली आहे. या गावाच्या अवतीभवती असलेली गाव गोसेखुर्द प्रकल्पामध्ये पुनर्वसनात सामील आहे तर केवळ या गावांना यापासून दूर ठेवण्यात आले आहे. गायडोंगरी गावात घरांची संख्या ८५ असून लोकसंख्या ४०० इतकी आहे. तसेच कवडशीमध्ये घरांची संख्या ३० असून लोकसंख्या १६० आहे.

भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील पवनी तहसील अंतर्गत येणाऱ्या या तीन गावांच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungaitiwar) यांनी सकारात्मक पाऊल उचलुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य मोबदला व पुनर्वसन करण्याचे निर्देश दिले आहेत. आता लवकरच या गावांचा समावेश होणार असल्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT