Nagpur News : नागपूर महापालिकेची निवडणूक चोवीस तासांवर येऊन ठेपली आहे. राजकीय वर्तुळात जोरात आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. आमचेच सरकार येणार असे दावे केले जात आहे. खासकरून मुंबई महापालिकेच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव आणि राज ठाकरे आमच्याशी गोड बोलतील असे वाटत नसल्याने सांगून राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज त्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
विधानसभेच्या निकालाप्रमाणेच महापालिका निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. आम्ही 51 टक्के मते घेऊन विजयी होणार असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. मुंबईसाठी उद्धव आणि राज ठाकरे दोन बंधू एकत्र आले आहेत. मुंबई आणि महाराष्ट्राला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचा दावा दोघांनी केला आहे. प्रचारात दोन्ही भाऊ भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुटून पडले होते. भावनिक मुद्दे उपस्थित केले होते.
यावर बावनकुळे यांनी त्यांनी रडीचा डाव खेळला, भावनिक मुद्दे उपस्थित केले असे असले तरी ते निवडून येतील असे दिसत नाही. त्यामुळे आजच मी त्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. निकाल जाहीर झाल्यानंतर ते आमच्याशी गोड बोलतील असे वाटत नसल्याची उपरोधिक टीकाही बावनकुळे यांनी केली.
काँग्रेस आणि ठाकरे सेनेने आधीच पराभव स्वीकारला असल्याचे दिसून येते. निकाल जाहीर झाल्यावर कोणावर खापर फोडायचे याची पूर्व तयारी दोघांनी केली आहे. एव्हीएम मशीलना दोष देणे त्यांनी पुन्हा सुरू केले आहे. बोगस मतदान आणि दुबार मतदानाचा आरोप केला जात आहे.
ठाकरे सेनेने बोगस मतदान होण्याची शक्यता वर्तविली आहे. दुबार मतदार आणि बोगस मतदान रोखण्यासाठी भगवे पथक तयार असल्याचा इशाराही ठाकरे बंधूंनी दिला आहे. यावर बावनकुळे यांनी या कृतीला लखलाभ असे म्हणले आहे. बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग करवाई करीत आहे. बोगस मतदान होणार नाही यासाठी सर्वच पक्षांनी मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले.
पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीवरून भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वाद चांगलेच टोकाला गेले आहे. जुन्या फाईल उकरून काढल्या जात आहे. राज्यात सत्तेत एकत्र असलेले दोन्ही पक्ष एकमेकांवर जाहीर टीका करीत आहेत. मैत्रीपूर्ण लढतीत एकमेकांवर वैयक्तिक टीका करायची नाही, मतभेद व मनभेद निर्माण होतील असे बोलायचे नाही हे ठरले होते. मात्र अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीमुळे त्रस्त झाल्याचे दिसत आहेत.
त्यांच्याकडून असे वागण्याची अपेक्षा नव्हती. अजित पवारांना (Ajit Pawar) दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करायची आहे की नाही हे मला माहिती नाही. तो निर्णय त्यांना घ्यायचा आहे. याची अधिकृत घोषणा होईल तेव्हा आपण या विषयावर बोलू असे सांगून बावनकुळे यांनी या विषयावर भाष्य करण्याचे टाळले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.