Congress sarkarnama
विदर्भ

Muslim Politics : मुस्लिम समाज काँग्रेसच्या अडचणी वाढवणार? विधानसभेला मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Rajesh Charpe

Muslim Politics : महाविकास आघाडीमुळे विधानसभेच्या जागा कमी आणि दावेदार जास्त झाले आहेत. प्रत्येकाला जागा वाढवून पाहिजे आहे. एका जागेवार तीनही पक्षाचे पाच ते सात उमेदवार इच्छुक आहेत. यामुळे मुस्लिम समाजामध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.

लोकसभेप्रमाणे विधानसभेतही मुस्लिम समाजाला डावलले जाण्याची भीती आहे. उमेदवारीमध्ये डावलल्यास मुस्लिम समाजाकडून वंचित बहूजन आघाडीचा पर्यायाची चाचपणी केली जात आहे.

लोकभेच्या निवडणुकीत काँग्रेसने मुस्लिम समाजाचा उमेदवार दिला नाही. त्यानंतर झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीतही प्रतिनिधित्व देण्यात आले नाही. यावर अनेकांनी यापूर्वीच नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेसच्या काही मुस्लिम नेत्यांनी एक बैठक घेऊन विधानसभेत समाजाला प्रतिनिधित्व देण्याची मागणी काँग्रेसकडे केली होती. यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथाला यांचीही भेट घेतली होती.

चार जागांवर दावा

विदर्भातील मध्य नागपूर, बाळापूर, अमरावती आणि अकोल पश्चिम या चार जागांवर मुस्लिम समाजाने दावा केला आहे. या चारही मतदारसंघात मुस्लिम समाजाची लोकसंख्या अधिक आहे. मुस्लिम समाज नेहमीच काँग्रेससोबत राहिला. लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या यशात मुस्लिम समाजाचा वाटा मोठा आहे. याकडे लक्ष वेधून मुस्लिम समाजाने विदर्भातील चार मतदारसंघावर दावा केला आहे.

चार मतदारसंघात एक लाख मतदार

विदर्भात 62 विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघात किमान 10 हजार मुस्लिम आहेत. चार विधानसभा मतदारसंघात एक लाखाच्या आसपास मुस्लिम समाजाची मते आहेत. असे असताना काही नेते मुस्लिमांना डावलण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला असल्याचे समजते.

नागपूर शहरात प्रतिनिधित्व नाही

लोकसभेच्या निवडणुकीत मोदी यांच्याच्या 400 पारचा नारा संविधान बदलाच्या भीतीने मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला मते दिली. काँग्रेसच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत प्रतिनिधित देताना समाजाचा विचार करावा. काँग्रेसने आम्हाला गृहित धरू नये, असा इशाराही मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांनी काँग्रेसला दिला आहे. मध्य नागपूरमधून अनिस अहमद निवडूण येत होते. ते राज्यात मंत्रीसुद्धा होते. त्यानंतर १० वर्षांपासून नागपूर शहरात एकाही मुस्लिमाला काँग्रेसने संधी दिली नाही.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT