Vijay wadettiwar, chandrashekhar bawnakule  Sarkarnama
विदर्भ

OBC front controversy : वडेट्टीवारांची राजकीय नौटंकी, आमची ठोस कृती; बावनकुळेंनी लगावला टोला

Chandrashekhar Bawankule Slams Vijay Wadettiwar Over OBC Front in Nagpur : विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांच्या ओबीसी मोर्चामुळे राज्यातील वातावरण तापले आहे.

Rajesh Charpe

Maharashtra political news : विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांच्या ओबीसी मोर्चामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. ओबीसीचे मारेकरी आणि कैवारी कोण? असा संभ्रम निर्माण समाजामध्ये निर्माण झाला आहे. विजय वडेट्टीवार सातत्याने महाज्योती आणि सारथी या दोन संस्थांना दिल्या जाणाऱ्या निधीची तुलना करतात. सारथीला सुसज्ज, तर महाज्योती भाड्याच्या कार्यालयात, असा आरोप ते सातत्याने राज्याच्या अर्थमंत्र्यांवर टीका करीत असतात.

यावर भाजप महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, सडेतोड उत्तर दिले. महाज्योतीच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे निमित्त साधत, काही राजकीय नेते मोर्चा काढून नौटंकी करीत आहे, असा टोला वडेट्टीवारांना लगावला.

महाज्योतीच्या या इमारतीच्या माध्यमातून 18 पगड जाती व बारा बलुतेदार समाजाला केंद्र व राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेला लाभ मिळणार आहे. त्याकरिता कार्यालयाची आवश्यकता होती. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. मुख्यमंत्र्यांनी राज्याला ओबीसी मंत्रालय दिले, असेही ते म्हणाले.

विशेष म्हणजे 2019मध्ये महाज्योती मंडळाची स्थापना झाली. त्यानंतर अडीच वर्ष महाविकास आघाडीचे (MVA) सरकार होते. विजय वडेट्टीवार ओबीसी खात्याचे मंत्री होते. एका अर्थाने बावनुकळे यांनी मंत्री असताना वडेट्टीवारांनी ओबीसी समाजासाठी काहीच केले नसल्याने निदर्शनास आणून दिले.

वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी काढण्यात आलेला जीआर रद्द करावा यासाठी मोठा मोर्चा काढला होता. या जीआरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मराठ्यांना ओबीसीत घुसडले जात असल्याचा आरोपही केला होता. त्यानंतर अलीकडेच भुजबळ यांनी बीडमध्ये मोर्चा काढला. आपल्या मोर्चाला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादाने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने भाजपने भुजबळांना आपल्यावर सोडले असल्याचा आरोप केला होता.

मात्र आरोप-प्रत्यारोंपामुळे ओबीसी समाजाला भव्य असे कार्यालय लवकरच लाभणार आहे. बावनकुळे आपल्या भाषणात म्हणाले, नागपूरमध्ये मोर्चा काढणाऱ्यांना मला सांगायचे आहे. महायुती सरकारने 2 सप्टेंबरला जो, जीआर काढला तो, फक्त चार जिल्ह्यांपुरता आहे.

जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे, तोपर्यंत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात ओबीसी समाजावर अन्याय झाला. महाज्योती बंद करण्यात आली होती. कोणी खोटे राजकारण करू नये, ओबीसी समाजात गैरसमज पसरवू नये असेही वडेट्टीवारांचे नाव न घेता बावनकुळे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT