Nagpur Blast sarkarnama
विदर्भ

Nagpur Blast : बाजारगावात सोलर एक्सप्लोसिव कंपनीत भीषण स्फोट; अनेकांचा मृत्यू

Solar Company : कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंग सुरू असतानाची घटना

प्रसन्न जकाते

Bajargaon Incident : नागपूरपासून जवळच असलेल्या बाजारगाव येथील सोलर कंपनीत झालेल्या भीषण स्फोटामध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रविवारी (ता. 17) सकाळी हा भीषण स्पॉट झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगचे काम सुरू असताना स्फोटाची घटना घडली. 6 महिला व 3 पुरुषांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे गावाकडे रवाना झालेत.

नागपूर ग्रामीण पोलिस आणि अग्निशमन दलाचे बंबही बाजारगावकडे रवाना करण्यात आलेत. बचाव पथकांनी घटनास्थळ गाठत माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. मृतकांची संख्या नेमकी किती आहे, याबद्दल अद्याप अनिश्चितता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बाजारगावातील ही सोलार कंपनी भारतातील अनेक कंपन्यांना दारुगोळा पुरवठा करते. संरक्षण क्षेत्राशी निगडीत काही कंपन्यांना ही कंपनी दारूगोळा पुरवित असल्याची माहिती पोलिसांनी 'सरकारनामा'ला दिली. 'एक्सप्लोसिव्ह'मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर होत असतो. हेच काम करत असताना स्फोट झाल्याची माहिती आहे. 2018 मध्येही या कंपनीमध्ये स्फोट झाला होता. त्यावेळी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. स्फोटानंतर ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनामुळे येथे तणाव निर्माण झाला होता. नागपूरचे सत्यनारायण नुवाल हे कंपनीचे संचालक असल्याची माहिती, पोलिसांनी दिली.

नुवाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या अत्यंत जवळचे असल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी कंपनीचा परिसर गाठत मुख्य प्रवेशद्वारापाशी जमलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवले. कंपनीचा संपूर्ण परिसर सील करण्यात आला. एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतकांची माहिती व स्फोटामागील नेमके कारण जाणून घेण्यासाठी तपासाला सुरुवात केली, असे नागपूर ग्रामीण पोलिसांनी सांगितले. स्फोटकांसाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनांमध्ये मिश्रण करताना ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT