Prafull Gudadhe Sarkarnama
विदर्भ

Voter Fraud : मुख्यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या गुडधेंवर काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; मतदार याद्यातील घोळ शोधणार

Congress Assigns Prafull Gudadhe to Probe Voter List Irregularities Against BJP Devendra Fadnavis : काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांनी फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात ऑनलाईन मतदार नोंदणीमध्ये मोठा घोळा असल्याचा दावा केला आहे.

Rajesh Charpe

Congress vs BJP Maharashtra : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदार याद्यांमध्ये घोळ करून निवडणूक जिंकली, असा आरोप करून त्यांच्या विरोधात न्यायलयात याचिका दाखल करणारे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडधे यांच्यावरच मतदार याद्यांची तपासण्याची जबाबदारी काँग्रेसने सोपविली आहे.

गुडधे यांनी फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात ऑनलाईन मतदार नोंदणीमध्ये मोठा घोळा असल्याचा दावा केला आहे.

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजप महायुतीने महाराष्ट्राची विधानसभा चोरली, अधिकाऱ्यांसोबत हातमिळवणी करून निवडणुकीत मॅचफिक्सिंग केल्याचा आरोप केला होता. राहुल गांधी आपला लेख आणि आरोपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी विधानसभा मतदारसंघाचा विशेष उल्लेख केला होता.

यानंतर गुडधे यांनी आपल्या मतदारसंघातील सर्व आकाडेवारी घेऊन समोर आले होते. लोकसभा ते विधानसभा या दरम्यानच्या पाच महिन्यांच्या कार्यकाळात सुमारे 33हजार मतदार (Voter) मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात वाढल्याचे त्यांनी सांगितले. मतदान नोंदणी करताना अधिकाऱ्यांनी कुठलीही खातरजमा केली नाही. ऑनलाईन मतदार नोंदणी करताना एकाच फोन नंबरवरून 40 ते शंभर मतदान नोंदवण्यात आले होते. नियमानुसार याची फेर तपासणी करण्यात आली नाही.

नियमानुसार मोठ्या संख्येने मतदान नोंदणी होते. तेव्हा अधिकाऱ्याने प्रत्यक्ष घरी जाऊन याची पडताळणी करणे आवश्यक असते. ऑनलाईन आणि ऑफ लाईन मतदार नोंदणीचा स्वतंत्र माहिती दिली जात नसल्याचा आरोप गडधे यांनी केला आहे. फडणवीस यांनी बेईमानीने निवडणूक जिंकली, असा आरोप करून त्यांनी राजीनामा देण्याची मागणी गडधे यांनी केली आहे. मात्र त्यांची निवडणूक याचिका ‘उपस्थितीच्या‘ नियमावरून उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

राहुल गांधी यांनी दिलेल्या निर्देशानुसार मतदार याद्यांमध्ये झालेली वाढ, त्याची पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याकरिता ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीत गुडधे यांचाही समावेश करण्यात आला आहे.

प्रफुल्ल गुडधे हे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ते दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढले आहेत. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा मॅच फिक्सिंगचा धोका असल्याने काँग्रेसने मतदार याद्यांवर आता आपले लक्ष केंद्रित केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT