uddhav thackeray | Nana Patole  sarkarnama
विदर्भ

Congress Vs Shivsena : वाद मिटेना! एकही मतदारसंघ ठाकरेंना दिल्यास ‘सांगली पॅटर्न’चा काँग्रेसचा इशारा

Mahavikas Aghadi Seat Sharing : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत जवळ येऊन ठेवली आहे. यातच जागावाटपावरून महाविकास आघाडीत तू-तू मैं-मैं सुरू आहे.

Akshay Sabale

Mumbai News: महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात असताना काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत ठिगणी पडली आहे. खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात जागावाटपाच्या बैठकीत खडाजंगी झाल्याचं बोललं जात आहे. यानंतर नागपुरातील काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते ठाकरेंच्या सेनेविरुद्ध आक्रमक झाले आहेत.

नागपूरमध्ये विधानसभेचे सहा मतदारसंघ आहे. मात्र, काँग्रेसकडे असलेल्या दक्षिण नागपूर आणि रामटेक विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटानं दावा केला. यामुळे काँग्रेसचे ( Congress ) कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. नागपुरातील सहाही विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे रहावेत, अशी मागणी नागपुरातील काँग्रेस नेते आणि इच्छुक उमेदवारांनी केली आहे.

त्यासाठी आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, गिरीष पांडव, संगीता तलमले यांच्यासह अनेक नेते मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांच्यासह प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. नागपुरातील एकही जागा मित्रपक्षाला ‘सांगली पॅटर्न’ आणि राजीनामा देण्याचा इशारा काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे.

आमच्यात कोणतेही वाद नाही...

दरम्यान, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं, "महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार आहे. उद्धव ठाकरे रूग्णालयात होते. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आम्ही गेलो होतो. त्यांची प्रकृती ठीक आहे. महाविकास आघाडीची प्रकृतीही ठीक आहे. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत.”

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT