Nagpur District Police Patil Sarkarnama
विदर्भ

Nagpur District News : चार मिनिटांत संपविल्या मुलाखती, अन् बाहेरगावच्यांना पोलिस पाटील म्हणून निवडले !

सरकारनामा ब्यूरो

There was a mess in the Police Patil recruitment process : पोलिस पाटील पदभरती प्रक्रियेत घोळ झाला आहे. जिल्ह्यातील नरखेड, काटोल आणि कुही तालुक्यात पदभरतीत लेखी आणि तोंडी परीक्षेत गुणांचा घोळ झाला आहे. काही ठिकाणी लेखी आणि मौखिक परीक्षेचे गुण वेगवेगळे तर काही ठिकाणी एकत्र दाखविले. पात्र उमेदवारांना डावलल्याचा आरोप करण्यात येत आहे. (It is being alleged that eligible candidates have been left out)

नागपूर जिल्ह्यातील नरखेड, काटोल तालुक्यात २६ जूनला लेखी परीक्षा घेण्यात आली. १९ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत तोंडी परीक्षा घेण्यात आली. लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला नाही. पण पात्र उमेदवारांना यादी टक्केवारीनुसार ऑनलाइन पद्धतीने कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली. निकालात लेखी आणि तोंडी परीक्षेचे गुण वेगवेगळे दाखविण्यात आले. यामुळे उमेदवारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

कमी शिकलेल्या उमेदवारांची निवड करण्यात आल्याचा आरोप कवडेती, मिथुन मेंडोले, अमर घाडगे, विद्या गायधने, किशोर कवडेती, नीलेश सातपुते, राजेश नेहारे, रोशन पंचभाई, संकेत देशमुख, विशाल ऊके, रवी चव्हाण, किशोर अप्पा, मुकेश राऊत, मुकुंदा सोनवाने, पंकज आटोणे, ललित नागमोते, जगदीश मुरोडीया व हंसराज गजभीयेसह तालुक्यातील अनेक उमेदवारांनी केला आहे.

यासंदर्भात काटोलचे उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही करण्यात आली. गुणांमधील संभ्रम दूर होईपर्यंत निवड झालेल्या उमेदवारांच्या यादीला स्थगिती देण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे. कुही तालुक्यात लेखी व मौखिक परीक्षेचे गुण वेगवेगळे दाखविण्यात आले. काही गावात ग्रामपंचायत सदस्यांनी पोलिस पाटील पदाकरिता अर्ज भरले. ग्रामपंचायत सदस्यांची निवडसुद्धा करण्यात आली.

जाहीरनाम्यानुसार पोलिस पाटील पूर्णवेळ धंदा किंवा नोकरी करणारा नसावा; परंतु काही गावातील उमेदवार कंपनीत कामावर आहे. त्यांची निवड करण्यात आली. गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांची पत्नी, भाऊ व अन्य नातेवाइकांची राजकीय दबाव आणून निवड प्रक्रिया करण्यात आली. यादीत काही उमेदवार रहिवासी नसून बाहेरगावी व्यवसायासाठी राहतात.

पोलिस पाटील ग्रामीण भागातील अत्यंत महत्त्वाचे पद आहे. त्यांनी मूळगावी राहणे गरजेचे आहे. तरीही बाहेरगावी राहणाऱ्या उमेदवारांची निवड झाली. या पदासाठीच्या मुलाखतीत पदाशी संबंध नसलेल्या प्रश्नांचा समावेश करण्यात आला, असा आरोप लेकुरवाळे यांचा आहे.

मुलाखतीला २० गुण होते तर या गुणांसाठी विचारलेले प्रश्न पोलिस पाटील किंवा शिक्षणासाठी संबंधित नव्हते. घरगुती प्रश्न विचारून चार मिनिटांत मुलाखती संपविण्यात आल्या. मुलाखतीनंतर पात्र यादी लावण्यास विलंब झाला. लेखी परीक्षा व मुलाखतीचे गुण वेगवेगळे जाहीर करावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा सभापती लेकुरवाळे यांच्यासह शिष्टमंडळाने दिला.

लेकुरवाळेंचा बेमुदत उपोषणाचा इशारा..

पोलिस (Police) पाटील भरतीत घोटाळा करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी, अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा जिल्हा परिषदेच्या (ZP) महिला व बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे यांनी दिला. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी (Collector) डॉ. विपीन इटनकर यांना दिले आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT