Mallikarju Reddi and Others. Sarkarnama
विदर्भ

Nagpur Fadanvis News : फडणवीसांनी मेळावा घेऊनही फुटली भाजपची मते; 'रेड्डी इम्पॅक्ट' झाला ?

Parshivani : देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचा कार्यकर्ता मेळावा झाला होता.

सरकारनामा ब्यूरो

Election of Chairman and Vice-Chairman of Taluka Sales Association : गेल्या रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी येथे भाजपचा कार्यकर्ता मेळावा झाला. त्यानंतर पारशिवनीत भाजपची ताकत वाढेल, अशी अपेक्षा होती. पण तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष व उपाध्यपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपची मते फुटली. (Disrupting BJP's views, Congress took the lead)

भाजपची मते फुटली असली तरी त्यांच्याच उमेदवारांचा विजय झाला. असे असले तरी विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहे. सहा दिवसांपूर्वी भाजपचा कार्यकर्ता मेळावा होऊनही मते फुटल्याने विविध चर्चांना ऊत आला आहे. तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक चुरशीची झाली. यामध्ये भाजपच्या मतांना खिंडार पाडत काँग्रेसने आघाडी घेतली.

नुकताच भाजपचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यामध्ये विभागाचे खासदार व आमदार उपस्थित होते. आपल्या पक्षाच्या मेळाव्यात खासदार व आमदार न बोलवता कशासाठी आले, हा सवाल करत माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी आकांडतांडव केला होता. ज्येष्ठ नेत्यांनाच त्यांनी भर सभेत खडे बोल सुनावले होते. त्या एपिसोडचा परिणाम म्हणून भाजपची मते फुटली असल्याची जोरदार चर्चा तालुक्यात आहे.

खरेदी विक्री संघांची स्थापना झाली, तेव्हापासून भाजपचेच वर्चस्व सतत राहिले आहे. परंतु यावेळेस मात्र काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार पुरुषोत्तम जवंजाळ यांना सात मते तर भाजपचे उमेदवार कांचन खेमगिर गिरी यांना आठ मते मिळाली. यामध्ये काँग्रेसचा निसटता पराभव झाला.

उपाध्यक्ष पदाकरिता काँग्रेसचे (Congress) आनंद काकडे यांना सहा मते तर भाजपचे राजेश कडू यांना नऊ मते प्राप्त झाली. भाजपकडे (BJP) दहा सदस्य तर काँग्रेसकडे फक्त पाच सदस्य असताना मात्र काँग्रेसला अध्यक्ष पदाकरिता सात मते प्राप्त झाली. तर उपाध्यक्ष पदाकरिता सहा मते प्राप्त झाल्याने भाजपचा निसटता विजय झाला.

या निवडणुकीची (Election) धुरा दयाराम भोयर, अशोक चिखले, सुभाष तडस, शालीक ढोंगे, प्रेम कूसुबे, इंद्रपाल गोरले, डॉ. वीरव्यंकटराव वाकलपुडी, शेषराव भलावी, रेवाजी भुजाडे, उमाजी बुरडे, अर्जुन भलावी, मिथुन उईके, भिवराज उईके यांनी सांभाळली. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार सुनील केदार यांनी मार्गदर्शन केले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT