Prashant Pawar and Others Sarkarnama
विदर्भ

Nagpur Floods News : श्रीमंतांनाच मदत देताय, झोपडपट्टीत राहणाऱ्यांचे काय? राष्ट्रवादी आक्रमक !

Atul Mehere

Nagpur Political News : नागपुरात गेल्या आठवड्यात शुक्रवारी (ता. २२) रात्री अतिवृष्टी झाली. त्यानंतर शहराला पुराचा जबरदस्त तडाखा बसला. शासकीय मालमत्तेसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले. पालकमंत्र्यांचा दौरा त्यानंतर झाला. पण मदत करताना प्रशासन श्रीमंत वर्गाची जास्त काळजी घेत आहे, तर गरिबांकडे दुर्लक्ष करत आहे. (NCP has come to the aid of the slum dwellers)

हा दुजाभाव खपवून घेतला जाणार नाही. श्रीमंतांना मदत करा, त्याबद्दल कुणाचीही ना नाही. पण झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब लोकांकडे दुर्लक्ष करू नका, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस झोपडपट्टीवासीयांच्या मदतीला धावली आहे. पाण्याने धो धो धुतल्यानंतर गरिबांना वाऱ्यावर सोडणार असाल, तर ही बाब अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

प्रशासनाकडून श्रीमंत वस्त्यांकडे प्रामुख्याने लक्ष देऊन पंचनामे केले जात आहेत, तर झोपडपट्ट्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) काल (ता. २६) आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांचे याकडे लक्ष वेधले.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी झोपडपट्टी भागात एकाही अधिकाऱ्याने दौरा केला नसल्याचे निदर्शनास आणून दिले. काचिपुरा परिसरातील चमेडिया हायस्कूलच्या मागील भागात सुमारे ३५० घरे आणि १४०० नागरिकांचे संसार उघड्यावर आले.

नवीन वसाहत गड्डी गोदाम, गोवा कॉलनी, मंगळवारी बाजार, धोबीघाट, स्विपर मोहल्ला, परदेशी मोहल्ला, गौतमनगर या परिसरात तीनशे घरांचे नुकसान झाले. या वस्तीत तीन दिवसांपासून खायला अन्न नसल्याचे वास्तव पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडले.

जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी तीन दिवसांत पूरग्रस्तांची पाहणी व पंचनामे करण्याचे आश्वासन दिले. यानंतर न्याय न मिळाल्यास मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा प्रशांत पवार यांनी दिला. आंदोलनात पवार यांच्यासह श्रीकांत शिवणकर, अनिल अहिरकर, आभा पांडे, ईश्वर बाळबुधे, विशाल खांडेकर, लक्ष्मी सावरकर, राजेश माटे, अरविंद भाजीपाले, रवी पराते आदींचा समावेश होता.

नाल्यांवरचे अतिक्रमण हटवा..

नाल्याच्या बाजूने हॉस्पिटल, कॉलेज, मॉल, बिल्डर्स, फ्लॅट स्कीम तसेच हॉस्पिटलच्या तळमजल्यावर पार्किंगच्या जागी अतिक्रमण करण्यात आले आहेत. अनधिकृत लॉनवाले अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन नाल्यामध्ये कचरा टाकतात. नाल्यावर असलेल्या अतिक्रमणाचे ऑडिट करून तत्काळ कारवाई करावी आणि संरक्षण देणाऱ्या मनपाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी यावेळी प्रशांत पवार यांनी केली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT